Yashashri Shinde Case  
क्राईम

Yashashri Shinde Case: यशश्री शिंदे प्रकरणात नवा खुलासा; त्यादिवशी तिने मित्राकडे मागितली मदत, पण...

Yashashri Shinde Case : यशश्री शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेख याच्या अटकेनंतर अनेक खुलासे समोर येतायत. यशश्रीची हत्या करण्याच्या उद्देशानेच दाऊद उरण येथे आला असल्याची कबुली त्याने दिलीय.

Bharat Jadhav

सिद्धेश म्हात्रे, साम प्रतिनिधी

उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठा खुलासा झालाय. लग्न करुन कर्नाटकला येण्यास नकार दिल्यानेच दाऊद शेखने यशश्री शिंदेची हत्या केल्याची कबुली आरोपी दाऊदने दिलीय. आज दाऊदला कोर्टात हजर केले असता पनवेल न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

यशश्री शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेख याच्या अटकेनंतर अनेक खुलासे समोर येतायत. लग्न करुन कर्नाटकला चल असा तगादा दाऊद लावत होता. मात्र यशश्री याला नकार देत रिस्पॉन्ड करत नसल्याने दाऊदने यशश्रीची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता. हत्या करण्याच्या हेतुनेच दाऊद शेख धारदार हत्यार घेऊन कर्नाटकातून उरणमध्ये आला होता.

येथे आल्यावर वारंवार तो यशश्रीला भेटण्यासाठी ये, अशी मागणी करत होता, मात्र यशश्री त्याला नकार देत होती. दाऊद शेखकडे यशश्रीचे काही फोटो होते, ते फोटो फेसबूकवर शेअर करण्यासाठी ब्लॅकमेल करत होता. फेसबूकवर फोटो टाकण्याची धमकी देत त्याने तिला जबरदस्ती भेटायला बोलावले. भेटायला आल्यावर दाऊद शेखने सर्व फोटो डिलिट केले. भेटीच्या वेळी देखील आरोपी दाऊद हा यशश्रीकडे लग्नाचा आणि कर्नाटकमध्ये येण्याचा तगादा लावत होता, मात्र यशश्री नकार देत असल्याने त्याने तिची धारदार हत्याराने वार करत हत्या केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिलीय.

हत्येनंतर दाऊद यशश्रीचा मोबाईल आणि हत्यार घेऊन कळंबोली येथून कर्नाटकची बस पकडून गावी निघून गेला. याप्रकारणात अद्याप यशश्रीचा मोबाईल आणि हत्या केलेले हत्यार पोलिसांना सापडले नसून आरोपी ज्या फोटोद्वारे ब्लॅकमेल करत होता त्या फोटोचा शोध देखील पोलीस घेत आहेत. हत्येच्या दिवशी यशस्वी ने तिच्या एका मित्राला फोन करून मदत मागितली मात्र नेटवर्क नसल्यामुळे दोघांमध्ये संभाषण होऊ शकले नाही.

हे सगळं प्रकरण आता उलगडले असलं तरी ही घटना टाळता आली असती कारण हात्येच्या ५ दिवसाआधीच आरोपीवर दाखल पोस्को गुन्ह्यात पनवेल न्यायालयाने दाऊद शेख विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढून त्याला लवकर अटक करण्याचे आदेश पोलीसांना दिले होते. पोलिसांनी या आदेशाचे गांभीर्याने पालन केले असते तर दाऊदला हत्या करण्याच्या आधीच अटक करण्यात आली असती. मात्र याबद्दल अद्यापही पोलिसांना कुठलीही कल्पना नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT