Crime Saam Tv
क्राईम

Crime News : भयंकर! कर्जतमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, फोटो-व्हिडीओ व्हायरल; ७ जणांना ठोकल्या बेड्या

Woman Physically Abused By 7 People in Karjat : कर्जतमध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी सात आरोपींना अटक केलीय.

Rohini Gudaghe

मुंबई : रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरात सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आलीय. या महिलेला धमकावून तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याचं समोर आलंय. घटनेनंतर कर्जतमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. नेमकी घटना काय घडली ? हे आपण सविस्तर जाणून घेवू या.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, कर्जतमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचं उघडकीस आलीय. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना बेड्या देखील ठोकल्या (Physically Abused) आहेत. आरोपी ठाकूरवाडी येथे राहत असल्याची माहिती मिळतेय. या आरोपीने आरोपीने आधी पीडित महिलेबरोबर ओळख वाढवली. हळुहळू तिचा विश्वास देखील संपादन केला.

कर्जतमध्ये सामूहिक बलात्काराची घटना

त्यानंतर आरोपीने पीडित महिलेचे मोबाईलवर आक्षेपार्ह छायाचित्र (Woman Physically Abused) मागवलं. पीडित महिलेने त्याला हे फोटो पाठवले. नंतर आरोपीने हे छायाचित्र सोशल मीडियावर टाकेल अशी धमकी देत तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतरही त्याने ते छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. नंतर इतर सहा आरोपींनी देखील पीडितेला छायाचित्र प्रसिद्ध करण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलीय. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बदलापूरमधील धक्कादायक घटना

दोन दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये पुन्हा एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली (Karjat News) होती. मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणीवर तिच्या मैत्रिणीच्याच परिचयाच्या दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. धक्कादायक बाब म्हणजे तरूणीच्या मैत्रिणीनेच पीडित तरुणीला गुंगीचं (Crime News) औषध दिलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीची मैत्रीण आणि तिचे दोन मित्र यांना अटक केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

SCROLL FOR NEXT