Wife killed husband in Kaushambi social media/x
क्राईम

Crime News : बायकोनं दीर्घायुष्यासाठी करवाचौथचा उपवास केला; रात्री जेवणात विष देऊन नवऱ्याला संपवलं!

Wife killed Her Husband in Kaushambi : कौशांबी येथे करवाचौथच्या दिवशीच पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. विष टाकलेले जेवण पतीला खायला घातलं. यात त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित आरोपी पत्नी पसार झाली होती.

Saam Tv

करवाचौथच्या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करते. पण उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे पत्नीने करवाचौथच्या दिवशीच आपल्या पतीची हत्या केली. पत्नीने दिवसा पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केला आणि रात्री उशिरा त्याच्या जेवणात विष मिसळून त्याला खायला घातले. त्यामुळे पतीची प्रकृती बिघडली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित आरोपी पत्नी पसार झाली होती. काही वेळाने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

दारानगर कडा धाम येथील लाल बहादूर शास्त्री नगरात ही धक्कादायक घटना घडली. ३२ वर्षीय शैलेशचे पत्नी सवितासोबत नेहमी खटके उडायचे. तो नेहमी निराश असायचा. रविवारी करवाचौथच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला, असे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

सविताने रात्री उशिरा शैलेशच्या जेवणात विष मिसळून त्याला खायला घातले. काही वेळाने त्याची तब्येत बिघडली. माहिती मिळाल्यानंतर कुटु्ंबीयांनी शैलशला तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे त्याचा काही वेळाने मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. मृताचा लहान भाऊ अखिलेश याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. आरोपी पत्नी घटनेनंतर पसार झाली होती. पोलिसांनी काही वेळाने तिला ताब्यात घेतले. तिची चौकशी करण्यात येत आहे, अशीही माहिती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, इस्माइलपूर गावात राहणाऱ्या शैलेशची रविवारी रात्री जेवल्यानंतर अचानक तब्येत बिघडली. त्याला सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्याची पत्नी सवितावर आरोप केला आहे. जेवणात विष मिसळल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर पोलिसांनी सविताला ताब्यात घेतले. तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT