Washim woman stomach found with a piece of cloth Saam Tv News
क्राईम

Shocking News : महिलेच्या प्रसूतीनंतर वर्षभराने पोटदुखी, शस्त्रक्रिया केल्यानंतर धक्कादायक चित्र...; नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकरली; VIDEO

Washim District Risod Hospital : वाशिमच्या रिसोड शहरातील अमोल नरवाडे यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये १० मे २०२४ रोजी एका महिलेची सिझेरियन प्रसूती झाली. ती प्रसूती व्यवस्थित करण्यात आली असून त्या महिलेला कोणताही त्रास जाणवला नाही.

Prashant Patil

मनोज जयस्वाल, साम टिव्ही

वाशिम : वाशिममध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाशिमच्या रिसोड येथील सुरेखा काबरा या महिलेला पोटदुखीचा त्रास होत असल्यानं संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल केलं असता, तिथे पोटाची शस्त्रक्रिया करून पोटातील कापडाचा तुकडा काढण्यात आला. या प्रकरणी रिसोड येथील खासगी रुग्णालयाचे डॉ. अमोल नरवाडे यांच्या विरोधात त्या महिलेचे पती गणेश काबरा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावर रिसोड येथील डॉ. अमोल नरवडे यांनी हे आरोप फेटाळले फेटाळले आहेत.

नेमकं काय घडलं?

वाशिमच्या रिसोड शहरातील अमोल नरवाडे यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये १० मे २०२४ रोजी एका महिलेची सिझेरियन प्रसूती झाली. ती प्रसूती व्यवस्थित करण्यात आली असून त्या महिलेला कोणताही त्रास जाणवला नाही. त्यानंतर त्या महिलेला थोडा त्रास झाल्यानंतर तिची सोनोग्राफीद्वारे तपासणी केली. मात्र, त्यात काहीही आढळलं नाही. तब्बल १ वर्षाच्या कालावधीनंतर त्या महिलेला पोटाचा त्रास जाणवू लागल्यानं नातेवाईक सांगत होते आणि त्यांनी त्या महिलेला संभाजीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून कापडाचा तुकडा काढण्यात आला. मात्र हा कपड्याचा तुकडा आम्ही जेव्हा सिझेरियन केलं त्यावेळी पोटात नव्हता. दरम्यानच्या काळात कुठेतरी त्यांनी शस्त्रक्रिया केली असता त्यावेळी तो राहिला असेल, त्यामुळे आमची कोणतीही चूक नाही, असं डॉक्टरांकडून आणि हॉस्पिटकडून सांगण्यात आलं आहे.

पैशांची मागणी करत पत्नीला घरात डांबलं

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांची मागणी करत विवाहितेला तिच्या पतीने घरात डांबून ठेवले. तसेच दोरीने बांधून ठेवत शोल्डर गरम करून चटके दिल्याची निर्दयी घटना समोर आली आहे. या प्रकरणी विवाहितेने फुलंब्री पोलीस ठाण्यात पती व दोन नणंदांविरोधात तक्रार दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौकावाडीत राहणाऱ्या हिना शेख (वय ३०) यांच्यासोबत घडली आहे. हिना शेख हिचे माहेर फुलंब्री असून तिचे चौकावाडी येथे राहणारे अजिम अब्दुल शेख यांच्याशी ८ वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. त्यांना एक पाच वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान हिना हिचा पती अजिम शेख हा हिनाकडे वारंवार पैशांची मागणी करत सतत शिवीगाळ करून मारहाण करत होता. हा त्रास कमी होत नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, २४ कॅरेट सोन्याचा भाव किती? पाहा लेटेस्ट दर

क्रिकेट विश्वावर शोककळा, ऑस्ट्रोलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूचं निधन

Jai Jawan Govinda Pathak: नऊ थरांनंतर आता दहा थरांचा विक्रम घडवण्यासाठी जय जवान पथक सज्ज|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

Javed Akhtar: 'तुझ्या पूर्वजांनी ब्रिटिशांचे बूट चाटले...'; 'पाकिस्तानी' म्हटल्याने जावेद अख्तर भडकले, ट्रोलरची केली बोलती बंद

SCROLL FOR NEXT