Washim Crime News Saam tv
क्राईम

Washim Crime News: वाशिममध्ये एकाच आठवड्यात तीन तरुणांची हत्या; धक्कादायक घटनांनी परिसरात भीतीचं वातावरण

Crime News: यातील दोन घटना शेतीच्या वादातून तर तिसरी हत्येची घटना रेशन तस्करीतून झाल्याची चर्चा आहे.

साम टिव्ही ब्युरो

Washim News:

वाशिम जिल्ह्यात गुन्हेगारी विश्वात सातत्याने वाढ होतेय. एकाच आठवड्यात तीन जणांची हत्या झालीये. यातील दोन घटना शेतीच्या वादातून तर तिसरी हत्येची घटना रेशन तस्करीतून झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Latest Crime News)

वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे आज एका तरुणाची हत्या झालीये. अनसिंग येथील शेख सलमान शेख बिस्मिल्ला हा युवक कालपासून बेपत्ता होता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. मात्र संपूर्ण गावभर शोध घेऊनही त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही.

दरम्यान, आज सकाळी सलमानचा मृतदेह अनसिंगपासून जवळच असलेल्या पुसद तालुक्यातील उळदी घाटात सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय.

सलमानच्या हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र धान्याच्या काळा बाजारातूनच ही हत्या झाल्याची चर्चा अनसिंग परिसरात सुरूये. जिल्ह्यातील हत्येची ही सलग तिसरी घटना आहे. याआधी दोन व्यक्ती अशाच पद्धतीने अचानक गायब झाल्या. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. घडत असलेल्या हत्येच्या घटनांमुळे जिल्ह्यामध्ये पोलिसांचा धाक राहिलाय की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

SCROLL FOR NEXT