Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : जुगाराचा नवा फंडा! फायटर कोंबड्यांची झुंज लावून पैशांचा खेळ, पोलिसांची मोठी कारवाई

Pune News : पुण्यात पैसे कमावण्यासाठी फायटर कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या सहा तरुणांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी छापा टाकून ५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात फायटर कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या सहा तरुणांना अटक

  • वानवडी पोलिसांनी इम्प्रेस गार्डन परिसरात छापा टाकला

  • ५ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

  • पोलिस तपासात आरोपींकडून कोंबड्यांची झुंज आणि पैशाची बाजी लावल्याचे उघड

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

पुण्यात ऐकावे ते नवलच! पैसे कमावण्यासाठी काही तरुणांनी फायटर कोंबड्यांची झुंज लावून त्यावर पैसे लावल्याची क्रूर घटना घडली आहे. जुगार खेळणारे व कोंबड्यांना क्रूरपणे वागणूक देणाऱ्या ६ आरोपींना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुण्यात अवैध धंदे व अवैधरित्या जुगार खेळणारे व चालविणारे इसमांवर कायदेशीर कारवाई केली जाते आहे. त्या अनुषंगाने वानवडी पोलीस ठाणेकडील तपासपथकातील अधिकारी व स्टाफ हे १९ ऑक्टोबरला हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत होते. यादरम्यान त्यांना माहिती मिळाली की, इम्प्रेस गार्डनच्या पाठीमागे,मोकळया जागेत,सार्वजनीक ठिकाणी पाच ते सहा इसम हे कोंबड्याची झुंज लावुन, त्यावर जुगार खेळत आहेत.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळेस पोलिसांना दोन टिम करुन काही तरुण कोंबड्यांवर झुंज लावुन त्यावर पैशाची बाजी लावत असल्याचं आढळलं. म्हणुन बातमी प्रमाणे खात्री झाल्याने वानवडी पोलीस ठाणे तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन अचानकपणे छापा टाकुन पैशांवर कोंबड्यांची झुंज लावणाऱ्या ०६ जणांना जागीच पकडले.

पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता या तरुणांची नावं अमोल सदाशिव खुर्द, मंगेश आप्पा चव्हाण, निखिल मनिष त्रिभुवन,अमिर आयुब खान, सचिन सदाशिव कांबळे आणि प्रणेश गणेश पॅरम अशी असून त्यांनी पैशावर कोंबड्यांची झुंज लावल्याचं कबुल केलं आहे. सदर तरुणांनी ६ रंगीबेरंगी कोंबडे व त्यांची ने आण करण्यासाठी आरोपींनी वापरलेल्या तंगुसच्या ६ पिशव्या ३ मोटारसायकल ५ मोबाईल हॅन्डसेट, रोख रक्कम २ हजार ५८५ असा एकुण ५ लाख ११ हजार ८८० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT