Chhattisgarh Crime News Saam tv
क्राईम

Chhattisgarh Crime: संतापजनक! काळी जादू करण्याचा संशय; गावकऱ्यांनी ३ महिलांसह ५ जणांची केली हत्या

Chhattisgarh Crime News: छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. अंधश्रद्धेतून गावकऱ्यांनी मिळून पाच जणांची हत्या केली. जादूटोणा करत असल्याच्या संशयातून हा हत्याकांड झाल्याचं सागंण्यात येत आहे.

Bharat Jadhav

छत्तीसगडमधील आदिवासी लोकसंख्या असलेल्या सुकमा जिल्ह्यातील एका गावात ५ जणांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आलीय. जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून एका महिलेसह दोन जोडप्यांना बेदम मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडप्रकरणी एकाच गावातील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना कोंटा पोलीस स्टेशनच्या परिसरातील एकतल गावात झालीय. मौसम कन्ना, त्यांची पत्नी मौसम बिरी, मौसम बुच्चा आणि त्यांची पत्नी मौसम आरजू , आणि लच्छी, अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. दरम्यान पोलिसांना या हत्या कांडाची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. सावलाम राजेश, सावलाम हिडमा, करम सत्यम, कुंजम मुकेश आणि पोडियाम एनका अशी अटक आरोपींची नावे आहेत.

राज्यातील बालोदाबाजार-भटपारा जिल्ह्यात गुरुवारी अशीच एक घटना घडली रहोती. यात ११ महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील चार जणांची जादूटोण्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली होती.

एकाच घरात चार मृतदेह, काँग्रेस नेत्याने संपूर्ण कुटुंबासह संपवलं आयुष्य

छत्तीसगडच्या जांजगीर-चंपा जिल्ह्यामध्ये एका काँग्रेस नेत्याने कुटुंबासह आत्महत्या केल्याची घटना घडली होती. काँग्रेस नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या घटनेत मोठ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर काँग्रेस नेते, त्यांची पत्नी आणि लहान मुलाला गंभीर अवस्थेत बिलासपूरच्या सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे रविवारी सकाळी उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT