Varanasi Crime Saam tv
क्राईम

Varanasi Crime: एकाच घरातील चौघांनी संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण

Varanasi Crime: एकाच कुटुंबातील ४ जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडलीय. मूळ आंध्र प्रदेशचे रहिवाशी असलेल्या या चार जणांनी वाराणसीत आपलं जीवन संपवलं. पोलिसांनी एक चिठ्ठी सापडली असून त्यातून घटनेचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय.

Bharat Jadhav

Varanasi Crime:

एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना वाराणसी येथे घडलीय. हे चौघेजण आंध्र प्रदेशमधील असल्याची माहिती मिळालीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाराणसी येथील देवंथपुरा येथील कैलास भवन धर्मशाळेतील एका खोलीत या चार जणांचा मृतदेह आढळून आलाय.(Latest News)

या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलीस आयुक्त अशोक मुथा जैन यांनी या घटनेची पाहणी करत पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या चौघांची ओळख पटलीय. या चौघांचा मृतदेह ज्या खोलीत आढळून आला त्या खोलीत तेलुगू भाषेत लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आलीय. कोंडा बाबू ( वय ५०), त्यांची पत्नी लावण्या ( वय ४५), मुलगा राजेश ( वय २५), जयराम ( वय २३), हे आंध्र प्रदेश राज्यातील गोदावरी जिल्ह्याचे राहिवशी होते. याविषयीचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीनुसार, बाबू यांचे त्यांच्या जिल्ह्यातील एका कुटुंबासोबत आर्थिक कारणावरून वाद झाला होता. त्याच कारणामुळे त्यांनी कुटुंबासह दोन ते चार महिन्यांपूर्वी आपलं गाव, घर सोडलं होतं. वादाच्या कारणामुळे बाबू आणि त्यांचे कुटुंबाने वेगवेगळ्या शहरात प्रवास करत होते. परंतु त्यांच्यावरील कर्ज वाढत असल्याने बाबू आणि त्यांच्या कुटुंबियांनी जीवन संपवण्याचं ठरवलं आणि वाराणसीतील धर्मशाळेत आत्महत्या केली, असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.

पोलीस आयुक्त जैन म्हणाले, तेलुगू भाषेतील चिठ्ठीचे नीट भाषांतर केल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, तसेच या आत्महत्येचं कारण स्पष्ट होईल. बाबू यांचा आर्थिक वाद कोणाशी होता हेदेखील समोर येईल. दरम्यान पोलिसांनी मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

या धर्मशाळेत राहत असलेल्या इतर भाविकांना बाबू यांची खोली बंद असल्याची आढळून आली होती. बऱ्याच वेळ झाला त्यांची खोली बंद होती. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे दाखल झाले त्यानंतर त्यांनी बाबू यांच्या खोलीचा दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्यानंतर पोलिसांना बाबू आणि त्यांच्या कुटुंबीय मृतअवस्थेत आढळून आले. पोलीस आयुक्त जैन, इतर पोलीस कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT