Uttar Pradesh Saam Tv
क्राईम

Tragedy in Uttar Pradesh : रीलमध्ये प्रँक बघितला, तसंच करायला गेला अन् जीव गमावला; मुलासोबत घडलं भयंकर

Uttar Pradesh :उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ११ वर्षीय मुलाने सोशल मीडियावर प्रँक व्हिडिओ बघितला आणि तशीच कृती केली. दुर्दैवाने यात गळफास लागून त्याचा मृत्यू झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttar Pradesh Shocking News :

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ११ वर्षीय मुलाने सोशल मीडियावर प्रँक व्हिडिओ बघितला आणि तशीच कृती केली. दुर्दैवाने यात गळफास लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

निखिल असे मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. त्याने सोशल मीडियावर एक प्रँक व्हिडिओ बघितला. त्यात दाखवल्याप्रमाणे त्याने खोलीच्या छताला टॉवेल बांधला. व्हिडिओतील कृतीचं अनुकरण करणाऱ्या या मुलाच्या गळ्याभोवती तो घट्ट आवळला गेला. यात त्याचा मृत्यू झाला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निखिलच्या वडिलांनी यासंदर्भात माहिती दिली. त्याने सोशल मीडियावर (Social Media) एक प्रँक व्हिडिओ पाहिला होता. कुटुंबीयांच्या मोबाइलमधील वॉचलिस्टमध्ये हा व्हिडिओ आढळून आला.

गुरुवारी दुपारी शाळेतून परतल्यानंतर निखिलने मोबाइलवर रील (Mobile reels) बघायला सुरुवात केली. रील्स पाहिल्यानंतर त्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कृती केली. छताला बांधलेला टॉवेल त्याच्या गळ्याभोवती घट्ट बसला. यात तो बेशुद्ध झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात (Hospital) नेले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले, असे मुलाच्या वडिलांनी सांगितले.

निखिलला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. भावंडामध्ये निखिल सर्वात मोठा होता. निखिलच्या कुटुंबीयांचा फोन चेक केला, तेव्हा एक प्रँक व्हिडिओ दिसला. वॉचलिस्टमध्ये हा व्हिडिओ होता, असे हमीरपुरचे एसपी दीक्षा शर्मा यांनी सांगितले. पालकांनी त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवावे. जेणेकरून कोणतीही वाईट गोष्ट मुले मोबाइलवर बघणार नाहीत, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT