Uttar Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Uttar Pradesh Crime: तरूणावर ४ जणांकडून अनैसर्गिक अत्याचार; व्हिडीओ शूट केला, व्यथित झाल्यामुळे स्वत:ला संपवलं

Rohini Gudaghe

उत्तर प्रदेशमध्ये एका २३ वर्षीय तरूणावर चारजणांनी अनैसर्गिक अत्याचार अन् मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला होता. ते पीडित तरूणाकडे पैशाची मागणी करत होते. या प्रकारामुळे व्यथित झालेल्या पीडित तरूणाने टोकाचा निर्णय घेत जीवन संपवलं. हा तरूण स्पर्धा परिक्षेची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

गोरखपूर जिल्ह्यात लैंगिक शोषण आणि अत्याचाराला बळी पडलेल्या २३ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार ही माहिती मिळत (Uttar Pradesh Crime) आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचा व्हिडिओ बनवून आरोपींनी पीडित तरुणाकडे पैशांची मागणी केली होती. त्याला हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरा तरुणाने आत्महत्या केली. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह कुटुंबीयांना आढळून आला होता.

चिलुआताल येथील करण उर्फ ​​आशुतोष मिश्रा (२६), देवेश राजनंद (२४), अंगद कुमार (२१) आणि मोहन प्रजापती (२०) या चार व्यक्तींविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली (Crime News) आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित तरूणाला आरोपींनी चिलुआताल भागातील एका हॉटेलच्या खोलीत ओलीस ठेवले होते. तेथे त्याच्यावर चारजणांनी लैंगिक अत्याचार केले. पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण आपल्या भावासोबत भाड्याच्या घरात राहत होता. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.

पीडित तरूणाने एका महिन्यापूर्वी करण नावाच्या व्यक्तीसोबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करणशी बोलणे सुरू केलं होतं. करणने त्याला चिलुआतल येथील त्याच्या घरी बोलावले होते. त्यानंतर करण त्याला चिलुआताल येथील हॉटेलमध्ये घेऊन (Physically Assault) गेला. तिथे करणचे तीन सहकारी त्यांच्यासोबत सामील झाले होते. त्यांनी पीडित तरूणावर लैंगिक अत्याचार करत बेल्टने मारहाण केली.

या आरोपींनी घटनेचं चित्रीकरण केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर सोडण्याची धमकी दिली होती, असं न करण्यासाठी आरोपी (Gorakhpur) पैशाची मागणी करत होते. त्यांनी पीडित तरूणाच्या फोनवरून युपीआयद्वारे पैसे हस्तांतरित करून बिअर खरेदी केली होती. पीडित तरूणाच्या आत्महत्येनंतर शुक्रवारी कलम ३७७ (अनैसर्गिक गुन्हा), ३८४ (खंडणी), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित तरतुदींनुसार एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT