Crime Saam Tv
क्राईम

Uttar Pradesh Crime : मोबाईलच्या बहाण्याने गाडीत बसवलं; दोघांनी केला अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Minor Girl Physically Abused By two youth In Gonda : उत्तर प्रदेशमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय.

Rohini Gudaghe

मुंबई : बदलापूर बालअत्याचार प्रकरण, कोलकाताचं महिला डॉक्टरवरील अत्याचार प्रकरण अजून ताजंच आहे. अशातच उत्तर प्रदेशमधून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय. दोन तरूणांनी मोबाईलच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीला गाडीत बसवलं अन् संधीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलंय. ही धक्कादायक घटना गोंडा जिल्ह्यामध्ये घडलेली आहे.

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे दोन तरूणांनी 'गाडीमध्ये बस तुला मोबाईल देतो', असं म्हणत अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवले. नंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गाडी एका खांबाला ( Uttar Pradesh Crime News) धडकली. यानंतर दोन्ही तरुण कार सोडून पळून गेले. त्यानंतर तरुणी पायीच घरी आली. घरी आल्यानंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात जावून दोन्ही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. मोहम्मद आरिफ आणि मोहम्मद रिजवान, अशी दोन्ही आरोपींची नावे (Minor Girl Physically Abused) आहेत. एक आरोपी पीडितेला आधीपासूनच ओळखत असल्याची माहिती आजतकच्या हवाल्यानुसार मिळतेय. सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलीय.

या प्रकरणाबाबत अप्पर पोलीस अधीक्षक मनोजकुमार रावत यांनी माहिती दिलीय की, दोन्ही तरुणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली ( Uttar Pradesh Crime) आहे. ८ सप्टेंबर २०१४ रोजी कोतवाली नगर भागात एका व्यक्तीने त्याच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दिली होती. पीडित मुलीच्या आईच्या लेखी तक्रारीवरून दाखल करण्यात आलाय.

पीडितेची वैद्यकीय तपासणी

पीडित मुलीच्या आईने पोलिसांनी सांगितलं की, या दोन तरूणांनी तिच्या मुलीला मोबाईल देण्याचा बहाणा करून गाडीत बसवलं. नंतर तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी चालवलेल्या घटनेमध्ये वापरलेले वाहन जप्त करण्यात (Crime News) आलंय. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आलीय. दोन्ही आरोपींचे नमुने घेऊन तपासासाठी पाठवण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

SCROLL FOR NEXT