Uttar Pradesh Crime  Saam Tv
क्राईम

Shocking: 'त्या दाढीवाल्या आजोबानं माझ्या...'. ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, शेजारी राहणाऱ्याचं भयंकर कृत्य

Uttar Pradesh Crime: शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने ८ वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार केला. चॉकलेटचे आमिष दाखवत आरोपीने हे कृत्य केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

Priya More

Summary:

  • उत्तर प्रदेशमध्ये ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

  • चॉकलेटचे आमिष दाखवत ६७ वर्षीय आरोपीनं केलं भयंकर कृत्य

  • आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली

  • या घटनेमुळे उत्तर प्रदेश हादरले

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये ८ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेमध्ये निघालेल्या या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवत आरोपी तिला सोबत घेऊन गेला. त्यानंतर ६७ वर्षांच्या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिजनौरच्या नगीना शहरात घडली. आठ वर्षांची मुलगी शाळेत जात असून ती दुसरीमध्ये शिकते. तिच्या शेजारी राहणारा ६७ वर्षीय व्यक्ती तिला नेहमी चॉकलेट देतो. गुरूवारी नेहमीप्रमाणे ही मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली होती. तिला या व्यक्तीने खूप सारे चॉकलेट दिले आणि दहा रुपये दिले. मुलगी जेव्हा घरी आली तेव्हा तिच्या आईने तिला हे चॉकलेट आणि पैसे कुठून आले याबद्दल विचारले. आरोपी पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य करायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा हे ऐकून तिच्या आईला धक्का बसला.

मुलीने तिच्या आईला सांगितले की, 'शाळेत जाताना दाढीवाला आजोबा मला कँडी आणि चॉकलेट देतो. कधीकधी नाश्ता आणि बिस्किटे देखील देतो आणि घाणेरडे बोलतो. तो माझ्या शरीराला कुठेपण हात लावतो.' हे ऐकून मुलीच्या आईने तिला आरोपीकडे नेले. मुलगी आणि तिची आई आल्याचे पाहून आरोपी घाबरला. त्याने उडवा उडवीची उत्तर दिली. महिलेने पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पीडित मुलीचे वडील उत्तराखंडमध्ये काम करतात. तर पीडित मुलगी आईसोबत नगीना येथे राहते. आरोपी पीडित मुलीला नेहमी मिठाई, चॉकटेलचे आमिष दाखवून तिच्यासोबत हे भयंकर कृत्य करायचा. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली होती. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT