Uttar Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Shocking: ड्रग्ज देऊन चौघांकडून सामूहिक बलात्कार, तक्रार द्यायला गेल्यावर पोलिसांनीही अब्रु लुटली अन् ₹५००००..., थरकाप उडवणारी घटना

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणाची तक्रार द्यायला ही तरुणी पोलिस ठाण्यात गेली होती. पण पोलिसांनीच तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. पोलिसांनी बलात्कार करत ५० हजार रुपये लुटल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

Priya More

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एका २८ वर्षीय तरुणीवर चार तरुणांनी गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही तरुणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेली पण पोलिसांनीच तिची अब्रू लुटली. एका पोलिसाने या तरुणीवर दोन दिवस बलात्कार केला आणि दुसऱ्या पोलिसाने आरोपींवर कारवाई करतो असे म्हणत ५० हजार रुपये लुटले असा आरोप पीडित तरुणीने केला. या घटनेनंतर बुलंदशहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली. या दोन्ही पोलिस उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

पीडित तरुणीने सांगितले की, नोव्हेंबर २०२४ मध्ये ४ तरुणांनी माझे अपरहण केले होते. कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देत त्यांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला होता. अलीगढ आणि इतर ठिकाणी ४८ दिवस मला ओलीस ठेवत त्यांनी माझ्यावर वारंवार बलात्कार केला आणि जबरदस्ती धर्मांतर करायला लावले होते. आरोपींमधील एकाशी इन्स्टाग्रावरून माझी ओळख झाली होती. तर इतर तिघे जण त्याचे मित्र होते.

आरोपीच्या तावडीतून पळून जाण्यात मी यशस्वी झाली. त्यानंतर मी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. या ठिकाणी एका उपनिरीक्षकाने मला खासगी निवासस्थानी बोलावले. त्याठिकाणी त्याने माझ्यावर दोन दिवस बलात्कार केला. तर दुसऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने आरोपीला अटक करण्यासाठी ५० हजार रुपये घेतले.

बुलंदशहरचे एसएसपी दिनेश कुमार यांनी सांगितले की, तरुणीने सुरूवातीला ४ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तरुणीने दोन पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. त्या दोघांचे देखील तात्काळ निलंबन करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या पोलिस अधिकाऱ्यांची देखील चौकशी केली जात आहे. चौकशीसाठी एक टीम तयार करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates: उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक; पॅनल क्रमांक 18 मधील मत पेट्या घेऊन जाताना गोंधळ

Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

Saam Tv Exit Poll: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंचा जोर कमी पडला? कुणाची सत्ता येणार? पाहा एक्झिट पोल

मुंबईत भाजपचा महापौर बसणार? महायुती मॅजिक फिगरच्या पार, पाहा एक्झिट पोल, VIDEO

Jalgaon Municipal Election Exit Poll: खान्देशातील सर्वात मोठ्या महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?

SCROLL FOR NEXT