Yashashri Shinde Case Saam Tv
क्राईम

Yashshri Shinde Case : उरण हत्या प्रकरणात मोठी अपडेट; यशश्री शिंदेचा मोबाइल पोलिसांना सापडला, पाहा VIDEO

Rohini Gudaghe

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही नवी मुंबई

यशश्री शिंदे हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालंय. यशश्री शिंदे हिचा मोबाइल पोलीसांना सापडला आहे. उरण बेलापूर रेल्वेमार्गालगत करण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना हा मोबाइल सापडला आहे. आता मोबाईल सापडल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार असल्याचं सांगितलं जातंय.

यशश्री शिंदेचा मोबाइल सापडला

उरणमधील यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरलाय. यशश्रीच्या मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी तपासाची सुत्र वेगानं फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या (Yashshree Mobile phone) आहेत. कर्नाटकमधून आरोपी दाऊद शेखला अटक केली होती. अशातच आता या प्रकरणी अत्यंत महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय.

खळबळजनक खुलासे अन् महत्त्वाचे धागेदोरे

यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाइल गहाळ झालेला (Yashshri Shinde Case) होता. अखेर हा गहाळ मोबाईल आता पोलिसांच्या हाती लागलाय. त्यामुळे याप्रकरणी अत्यंत महत्वाचा असलेला पुरावा पोलिसांना मिळालेला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी आणखीन खळबळजनक खुलासे अन् महत्त्वाचे धागेदोरे समोर येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मागील पाच वर्षांपासून आमच्यामध्ये मोबाइलवरून संपर्क होत होता, अशी कबुली आरोपी दाऊद शेखनं अटकेनंतर दिली होती.

यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची हत्या

परंतु घटनेनंतर पोलिसांना यशश्रीचा मोबाइल मिळत नव्हता. त्यामुळे दाऊदनं कबुली दिल्यानंतर देखील पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. परंतु आता यशश्रीचा मोबाईल सापडला आहे. त्यामुळे पोलिसांना याप्रकरणी तपास करणं, आता सोपं होणार (Yashshri Shinde Case Update) आहे. पोलिसांनी डाटा मिळविण्यासाठी फोन लॅबकडे पाठवला (Uran News) आहे. उरणमधील २२ वर्षीय यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची निर्घृणपणे हत्या झाली होती. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचं उघडकीस आलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT