UP Crime News Saam Digital
क्राईम

UP Crime News: पत्नी, मुलांना दिले नशेचे इंजेक्शन, नंतर हातोड्याने केले वार... वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कृत्याने खळबळ

UP Crime News: रायबरेलीतील मॉडर्न रेल्वे कोच फॅक्टरीच्या निवासी संकुलातून एक मनहेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या फॅक्टरीतील अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून रायबरेलीत खळबळ माजली आहे.

Sandeep Gawade

UP Crime News

रायबरेलीतील मॉडर्न रेल्वे कोच फॅक्टरीच्या निवासी संकुलातून एक मनहेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या फॅक्टरीतील अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून रायबरेलीत खळबळ माजली आहे. डॉक्टर अरुण कुमार सिंह, त्यांची पत्नी अर्चना, मुलगा आरव आणि मुलगी अदिवा अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकरण लालगंज कोतवाली येथील मॉडर्न रेल्वेकोच फॅक्टरीच्या निवासी संकुलातील आहे. इथे राहात असलेले डॉक्टर अरुण कुमार यांनी पत्नी आणि आपल्या दोन मुलांनी आधी नशेच इंजक्शन दिले. त्यानंतर हातोड्याने वार करून तिघांचीही हत्या केली. यानंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान एकाचवेळी एकाच कुटुंबातील चार जणांचा अशाप्रकारे अंत झाल्यामुळे खळबळ माजली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरपीएफने याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसपी, अतिरिक्त एसपी, सीओ आणि फॉरेन्सिक टीम घटनास्ळी पोहोचले. दरवाजा आतून बंद होता त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. डॉक्टरचा मृतदेह घरात लटकेल्या स्थिती आढळून आला. तर बाकीच्याचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडले होते.

गेल्या काही दिवसांपासून डॉ. अरुण कुमार माणसिक तणावात होते. दरम्यान रविवारी त्याला शेवटचे पाहण्यात आले होते. त्यानंतर ते कोणालच दिसले नसल्यामुळे संशय बळावला होता. घटनास्थळी अमली पदार्थांचे इंजेक्शन सापडले आहेत. शवविच्छेदनानंतर याबाबत अधिक माहिती मिळेल अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT