man found Dead at Kalyan Khadvli river area. saam tv
क्राईम

Kalyan Crime : खडवली नदीकाठी तरूणाचा मृतदेह आढळला; पोलिसांना वेगळाच संशय

Khadavli River Titwala crime news : कल्याण तालुक्यातील खडवली नदीच्या परिसरात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या तरुणाची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Nandkumar Joshi

संघर्ष गांगुर्डे, कल्याण, साम टीव्ही

कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडवली नदीच्या काठावर अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. २१ एप्रिलला हा मृतदेह सापडला. तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० आहे. वृत्त प्रसिद्ध करेपर्यंत त्याची ओळख पटलेली नव्हती. खडवली नदीकाठच्या परिसरात तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर टिटवाळा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली.

तरुणाची हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही हत्या असेल तर ती कोणी आणि का केली, याचा तपास करण्यात येत आहे. मृत व्यक्तीबाबत काही माहिती असेल किंवा कोणी व्यक्ती हरवलेली असेल, तर त्यांनी तात्काळ कल्याण तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना गजाआड करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

व्यावसायिकाची हत्या, मृतदेह गोणीत भरून नाल्यात फेकला

पराग ढोबळे, नागपूर, साम टीव्ही

नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारा नदीच्या पुलाखाली व्यावसायिकाचा मृतदेह आढळला. त्याची हत्या करून मृतदेह गोणीत बांधून कोरड्या पात्रात फेकला होता. सुनील साहू असं मृताचं नाव असल्याचे सांगण्यात येते. ते गेस्ट हाऊस व्यावसायिक होते. ते बेपत्ता झाल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

साहू यांची हत्या करून मृतदेह गोणीत बांधून त्याठिकाणी फेकण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. हत्येचे कारण अस्पष्ट आहे. विविध दिशेने हा तपास सुरू आहे. जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. संशयित आरोपींचा शोध घेतल्यानंतर या हत्येचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पैसे किंवा जमिनीबाबत त्याचे काही वाद होते का, याचाही तपास सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवान बंडीवार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT