Ulhasnagar Crime News Saam TV
क्राईम

Ulhasnagar Crime News: मित्रानेच पाठीत खंजीर खुपसला; जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर प्राणघातक हल्ला

Crime News: हल्ला करणारा तरुण हा जखमीचा मित्र असून, काही दिवसांपूर्वी त्या दोघांचं भांडण झालं होतं. जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ulhasnagar:

उल्हासनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यरात्री कॅम्प क्रमांक दोन येथील पवन ज्यूस सेंटर जवळ एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अय्याज मोहम्मद खान या तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात तरुण जखमी झालाय. नराधमांनी यावरच न थांबता पुढे जखमी तरुणास मोटार सायकलवर बसवून त्याच्या पाठीत, डोक्यात, मानेवर धारदार शस्त्राने केला.

हल्ला करणारा तरुण हा जखमीचा मित्र असून, काही दिवसांपूर्वी त्या दोघांचं भांडण झालं होतं. जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. हल्ला करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी लागलीच अटक केली आहे. जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने रात्री उशिरा त्याला मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

बारमध्ये बारचालक आणि ग्राहकांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या तिन्ही शहरांत दिवसेंदिवस हाणामारीच्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. बदलापूर पूर्व येथील कात्रप परिसरात असलेल्या शुभम बारमध्ये पैसे देण्याघेण्याच्या वादात बार चालक आणि ग्राहकांमध्ये तुफान फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय. याप्रकरणी बार चालक आणि ग्राहकाने परस्पर एकमेकांविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस अधिक तपास करित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT