Chandrapur News 
क्राईम

Chandrapur News : दारू सोडण्यासाठी औषध घेतलं, दोघा तरुणांनी गमावला जीव; चंद्रपूरमधील धक्कादायक घटना

Chandrapur News: भद्रावती तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलीय. दारुचं व्यसन सोडण्याचं औषध घेतल्याने दोन जणांचा मृत्यू झालाय. दारू सोडण्यासाठी ते एका महाराजाकडे उपचार घेत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय तुमराम, साम प्रतिनिधी

चंद्रपूर: जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात धक्कादायक घटना घडलीय. दारूचं व्यसन सोडण्याचं औषध घेतल्याने गुडगाव येथे राहणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू झालाय. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. व्यसन सोडण्यासाठी घेतलेल्या औषधानेच जीव गेल्याने परिसरात खळबळ उडालीय.

सहयोग सदाशिव जीवतोडे (१९), प्रतीक घनश्याम दडमल (२६) राहणार गुळगाव, अशी मृतकांची नावे आहेत, तर सदाशिव पुंजाराम जीवतोडे (४५) व सोमेश्वर उद्धव वाकडे (३५) या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे चारी मद्यपी गुडगाव येथील असून मद्यपी वर्धा जिल्ह्यातील जाम जवळच्या शेडगाव येथे शेळके महाराजांकडे दारू सोडण्यासाठी गेले होते. महाराजांनी त्यांना दारू सोडण्याची औषध दिलं. त्यानंतर ते आपल्या गावी गुळगाव येथे परत आले. त्यानंतर या चौघांचीही प्रकृती बिघडली. त्यानंतर लगेच भद्रावती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. यामध्ये सहयोग आणि प्रतीक या दोघांचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. इतर तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेचा तपास भद्रावती पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT