Akola Crime Saam Tv
क्राईम

Akola Crime : तोतयांची चालबाजी; पोलीस असल्याचं भासवत दुचाकी पळवली

Akola Crime: पोलीस असल्याचं भासवत तोतया चोरांनी एका तरुणाकडून दुचाकी पळवली. याप्रकरणी पातुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. वाहतूक पोलीस असल्याचं भासवत ते दुचाकी चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अक्षय गवळी, अकोला)

Akola bike Theft :

पोलिसांचा पेहराव करून फिरणाऱ्या ४ तोतया पोलिसांना गजाआड करण्यात पातुर पोलिसांना यश आलंय. चौघेजण वाहतूक पोलीस असल्याचे भासवत दुचाकी चोरत असल्याचं तपासात समोर आलंय. अकोल्यात तोतया पोलिसांच्या टोळीनं चांगलाच धुमाकूळ घातला होता. पोलीस असल्याचं सांगत दुचाकी चोरी करत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले होते. अखेर त्याचा घडा भरला अन् टोळीतील चौघेजण पोलिसांच्या हाती लागले. (Latest News)

या चौघांनी अकोला जिल्ह्यातल्या पातुर पोलीस स्टेशन हद्दीतल्या बेलुरा फाट्याजवळ एका तरुणाला लक्ष करत त्याची दुचाकी पळवली. ज्या व्यक्तीची दुचाकी पळवली त्याच नाव ओम मोहरूत आहे. ओम यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, आपण दुचाकीनं जात असताना दोन जणांनी रस्त्यात अडवून ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाचे कागदपत्र मागितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कागदपत्रात काही त्रुटी असल्याने दुचाकी पोलीस ठाण्यात जमा करत असल्याचं सांगत दुचाकी आणि मोबाइल घेऊन गेले. थोड्या वेळानं तक्रारदार ओम हा पातुर पोलीस ठाण्यात पोहोचला. आपल्या दुचाकी संदर्भात पोलिसांना विचारू लागलाय. या दरम्यान पातुर पोलिसांनी आपण कुठल्याही प्रकारची दुचाकी जमा केले नसल्याचं त्याला सांगितलं.

त्यानंतर चान्नी पोलीस ठाण्यातही दुचाकीबद्दल थांगपत्ता लागला नाही. हे ऐकून पातुर पोलिसांनी धक्का बसला. यानंतर पातुर पोलिसात दुचाकी चोरीची तक्रार दाखल झाली. पोलिसांना तपासादरम्यान दोन लोकांना अटक केली. त्यानंतर पुन्हा आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. वाहतूक पोलीस असल्याचं भासवून तक्रारदार ओमकडून दुचाकी चोरल्याचं त्यांनी कबुली दिलीय.

गजानन जुमडे, दिनेश कुकडे, संतोष तायडे आणि इकबाल मोहम्मद रफीक असं या चौघांची नावे आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी गेलेली दुचाकी आणि गुन्ह्यात वापरलेले दुचाकी असे एकत्रित दीड लाखांच्या जवळपास मुद्देमाल जप्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार विधान भवनात

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT