Firing  Saam Digital
क्राईम

Crime News : शहापूर हादरलं! महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू

Thane local crime News : गर्दीच्या ठिकाणी दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकवरून गोळीबार केला. यामध्ये महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झालाय. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Namdeo Kumbhar

Thane Crime News : ठाण्यातील शहापूरमध्ये गजबजलेल्या बाजारपेठमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर दोन अज्ञात हल्लेखोराने दुचाकीवर येऊन धडाधड गोळ्या झाडल्या. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. त्या अज्ञात व्यक्तीने गोळीबार का केला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गोळीबाराची माहिती समजताच शाहपूरमध्ये एकच खळबळ उडाली. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

शहापूर तालुक्यातील पंडित नाका येथील बाजारपेठेत असणार्‍या महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर शनिवारी रात्री गोळीबार झाला. गोळीबारात २५ वर्षीय दिनेशकुमार चौधरी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा आज सकाळी मृत्यू झालाय. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शोध घेत आहेत. आरोपी फरार झाले आहेत, पोलीस त्यांच्या मागावर आहेत. शहापूरमध्ये या घटनेमुळे एकच खळबळ व्यक्त करण्यात येत आहे.

शनिवारी रात्री साडे नऊ वाजता महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून गोळीबार केला. या गोळीबारात महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या दिनेशकुमार मोनाराम चौधरी या कामगाराच्या छातीत गोळी लागली. त्याला शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोराने गोळी का झाडली? याचा शोध पोलीस घेत आहे. मारेकरी कोण आहेत याचाही तपास स्थानिक गुन्हा शाखा व शहापूर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT