Thane Crime  Yandex
क्राईम

Crime News: प्रेमाचा भयानक शेवट! लग्नासाठी प्रेयसीचा दबाव, संतापलेल्या टॅक्सी ड्रायव्हरकडून भयानक कृत्य

Taxi Driver Killed Woman: नवी मुंबईमध्ये एका २७ वर्षीय महिलेचा मृतदेह पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका २८ वर्षीय टॅक्सी ड्रायरव्हरला अटक केली आहे.

Rohini Gudaghe

नवी मुंबईमध्ये एका २७ वर्षीय महिलेचा मृतदेह पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका २८ वर्षीय टॅक्सी ड्रायरव्हरला अटक केली (Crime News) आहे. लग्न करण्यासाठी दबाव टाकल्याच्या वादातून या महिलेची हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

रविवारी नवी मुंबई पोलिसांनी सांगिकलं की, त्यांनी एका २८ वर्षीय टॅक्सी ड्रायव्हरला नवी मुंबई पोलिसांनी एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी अटक केली (Thane Crime) आहे. त्यांना २५ एप्रिल रोजी सकाळी एका २७ वर्षीय महिलेचा मृतदेह नवी मुंबईतील उरण भागातील चिरनेर-खारपाडा येथे तळेखार येथे कोरड्या नाल्यात आढळला होता. तो मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला (Taxi Driver Killed Women) असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा (Dispute Over Marriage) दाखल केला. याप्रकरणी तपासादरम्यान पोलिसांना १८ एप्रिल रोजी मुंबईतील मानखुर्द पोलीस ठाण्यातून एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतरच्या पडताळणीत उरणमध्ये सापडलेला मृतदेह हा 'त्या' बेपत्ता महिलेचाच असल्याचं स्पष्ट झालं. अधिक चौकशीत असं दिसून (Love Affair) आलं की, महिलेचे मुमपुरातील नागपाडा येथील टॅक्सी चालकाशी प्रेमसंबंध होते. ही महिला सारखी आरोपीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे कंटाळून आरोपीने टोकाचं पाऊल उचललं होतं.

१८ एप्रिल रोजी आरोपीने मृत महिलेला ठाणे (crime) जिल्ह्यातील कल्याण परिसरातील खडवली येथे नेले. त्याने १९ एप्रिल रोजी पहाटे एकच्या सुमारास त्या महिलेची हत्या केली. तिचा मृतदेह नाल्यात टाकला. आरोपीला अटक करण्यात आली आणि कोर्टासमोर जबाब सादर करण्यात आला. त्यांनी त्याला २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी (Thane Crime News) सुनावली आहे. प्रेमाचा भयानक शेवट झाल्याचं या प्रकरणात पाहायला मिळालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: नवजात बाळाला गाईचं दूध दिलं, शरीरात झालं इन्फेक्शन; २१ दिवसानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

Mugachi Khichdi Recipe: मऊ, लुसलुशीत मुगाची खिचडी कशी बनवाल?

Ulhasnagar: घराबाहेर पडला अन् टेरेसवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं; उल्हासनगरमध्ये खळबळ

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १० दिवस बंद राहणार! | VIDEO

SCROLL FOR NEXT