Beed Under Scrutiny 
क्राईम

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडागर्दी! तुला खल्लासच करतो म्हणत तरुणाला बेदम मारहाण| VIDEO व्हायरल

Beed Crime News Update : बीडमध्ये गुन्हेगारी थांबायचे नाव घेत नाही, अंबाजोगाईमध्ये एका तरूणाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद

Beed Crime News Update : गेल्या काही दिवसांपासून बीडची ढासळलेली कायदा सुव्यवस्था चर्चेत आहे. मारहाण आणि हाणामारीचा दररोज एक व्हिडीओ समोर येतो. अंबाजोगाई येथील मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दारूसाठी मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा घेण्यास विलंब केल्यामुळेही खळबळ उडाली आहे.

बीडच्या अंबाजोगाईतील दस्तगीरवाडी येथील अल्पवयीन मुलास रिंगण करून मारल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्याचे पैसे घेतले, मोबाईल हिसकावला गेला. गुन्हा घेण्यास पोलीसांनी विलंब केला. अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा का नोंद केला नाही...? याप्रकरण बीडमध्ये एकच संतापाचे वातावरण आहे.

बीड पोलिस अधीक्षकांनी तात्काळ दखल घ्यावी. सर्व आरोपीला अटक करण्याचे आदेश द्यावेत. आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करावे. तात्काळ आरोपीना अटक करून कायद्याचा जबर धाक दाखवला पाहिजे, अशी मागणी बीडमधील लोकांनी केली आहे.

व्हिडीओ काढून बीड जिल्ह्यात मारण्याचे प्रकार वाढले आहेत, त्या अनुषंगाने कुणी जाणीवपूर्वक हे करतंय का? यामागे पोलीसांना, पोलीस अधीक्षकांना बदनाम करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेचा मुद्धा निर्माण करण्यासाठी हे कृत्य करतंय का याची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

राज्य सरकारने गंभीर्याने दखल घ्यावी. मुख्यमंत्री गृहमंत्री सपसेल फेल झालेले आहेत. त्यांच्या कारकीर्तीला चॅलेंज देणाऱ्यांना ते रोखू शकलेले नाहीत त्यामुळे दलितांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ऑल इंडिया पँथर सेना जाहीर निषेध करत असून तात्काळ आरोपीला अटक करण्याची मागणी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veen Doghantali hi Tutena: समर-स्वानंदी गेले नाटक पाहायला; 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये स्वप्नील जोशीची एन्ट्री

Commonwealth Games 2026: 36 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! भारतीय ज्युडोपटूंचा इतिहास; अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांची सुवर्णपदकाची कमाई

Maharashtra News Live: आदेश आला तर मंत्रीपद सोडण्याची तयारी- भरत गोगावले

गुलाबी अदा! प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नजर हटत नाही

BJP: मोठी बातमी! भाजपला मोठा हादरा, आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT