teacher hits student karegaon ashram school mokhada near palghar  Saam TV
क्राईम

Palghar : कारेगाव आश्रमशाळेतील विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण, अधिक्षकांची रुग्णालयात धाव

आश्रमशाळेतील अधिक्षक बाहेर गेले असता घडला हाेता प्रकार.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Palghar Crime News :

आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध पडे पर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कारेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत घडली. दरम्यान शिक्षकावर कारवाई हाेऊ नये यासाठी पालकांवर दबाव टाकला जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.  (Maharashtra News)

प्राप्त माहितीनूसार इयत्ता 9 वीत शिकणारा विद्यार्थी रुद्राक्ष दत्ता पागी हा जेवण घेण्यासाठी गेला हाेता. त्यावेळी तुझ्या हातात दोन लाडू कसे असे विचारात त्याला एका शिक्षकाने काठीने बेदम मारहाण केली. त्यामुळे विद्यार्थी घाबरला. ताे जमिनीवर कोसळला व बेशुद्ध पडला.

या आश्रमशाळेतील बाहेर गेलेले अधिक्षक हे जेव्हा शाळेत आले तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांला रूग्णालयात नेले. त्याच्यावर उपचार केले. दरम्यान गरीब आदिवासी विद्यार्थी असल्याने त्याच्या आई वडीलांवर शिक्षकाविरोधात तक्रार करु नये यासाठी दबाव टाकला गेल्याची चर्चा सुरु आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साम टीव्हीशी बाेलताना अधिक्षकांनी आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला आजारी असल्याने त्यास मी रूग्णालयात घेऊन गेलो होतो. जेव्हा मी पुन्हा परत आलो तर या विद्यार्थ्यांला शिक्षकाने मारले होते म्हणून मी तत्काळ त्यालाही रूग्णालयात उपचारासाठी घेऊन गेलो असे सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे कार अपघातात निधन; २४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीत विश्वावर शोककळा

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! २ दिवसात हे काम कराच अन्यथा पीएम किसानचे ₹२००० बंद होणार

Maharashtra News Live Update: आज पुणे स्टेशनवरून एकही लोकल सुटणार नाही

३२ वर्षीय बायकोचे शिक्षकासोबत अफेअर; ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं, नागपुरातील धक्कादायक घटना

Gayatri Datar Mangalsutra Design: शिव-शक्तीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं! गायत्री दातारच्या 'दोन वाट्यांच्या' मंगळसूत्राने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT