tarapur police arrests teacher in minor girl molestation case near palghar  Saam Tv
क्राईम

Crime News : विद्यार्थींनीशी अश्लील चाळे, शिक्षकास अटक

या प्रकारामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रुपेश पाटील

Palghar Crime News :

शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मोबाईलमधील अश्लील फोटो दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पालघर जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. तारापूर पोलीस ठाणे (tarapur police station) हद्दीतील एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला हाेता. त्यानंतर तारापूर पोलीसांनी शिक्षकावर गुन्हा दाखल करत त्याच्यावर कारवाई केली. (Maharashtra News)

तारापूर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार एका शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईल मधले अश्लील फोटो दाखवून शिक्षकाने संबंधित विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केले. त्याबाबतची तक्रार विद्यार्थिनीने तारापूर पोलीस ठाण्यात दिली.

पाेलिसांनी घटनेचा तपास करीत संबंधित शिक्षकावर कलम 354 सह पाेक्साे कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर शिक्षकाला तारापूर पोलिसांनी अटक केली. तारापूर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT