Kolhapur News Saam Tv
क्राईम

Kolhapur News: कोल्हापुरात सहलीच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक, दसरा चौकात तणावाचं वातावरण

Picnic Bus : कोल्हापुरातील दसरा चौकात शालेय सहलीच्या बसवर दगडफेक झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(रणजीत माजगावकर, कोल्हापूर)

Stones Pelting On Picnic Bus In Kolhapur :

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथे एका शालेय सहलीच्या बसवर दगडफेक झाल्याची घटना घडलीय. दगडफेक झाल्यानंतर जमाव पसार झालाय. सहलीच्या बसवर दगडफेक झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय.(Latest News)

काही अज्ञातांकडूनी ही दगडफेक करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शहरात आज सकाळपासून अतिक्रमणच्या मुद्द्यावरुन गोंधळ सुरू होता. त्यात आज संध्याकाळी वाहनांवर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोल्हापूरमध्ये सध्या अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी येत आहे. तसेच शाळेच्या सहलीदेखील कोल्हापुरात येत आहेत. या सर्व भाविक आणि पर्यटकांच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था दसरा चौकच्या पार्किंगमध्ये करण्यात आलेली आहे.या ठिकाणी उभ्या असलेल्या शाळेच्या एका बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. त्याचबरोबर आणखी दोन चारचाकी वाहनांची तोडफोड अज्ञातांनी केलीय. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. नेमकी घटना काय झाली आहे, दगडफेक का झाली, कोणी केली? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medha Rana: बॉर्डर २ मध्ये झळकणारी मेधा राणा कोण? जाणून घ्या

Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन! 38 मच्छिमारांवर कारवाई | VIDEO

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT