Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार; सावत्र बापाला १४१ वर्षांचा ठोठावला तुरुंगवास

Kerala Court News: अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या सावत्र पित्याला न्यायालयाने १४१ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसावा यासाठी अनेक पावलं उचलण्यात येतात. अल्पवयीन मुलांवरील अनैतिक कृत्ये आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वेगळा POCSO कायदा आणण्यात आलाय. अशा अनेक प्रकरणांमध्ये आपली जवळची माणसं गुंतलेली असतात. केरळमध्येही असाच धक्कादायक प्रकार समोर आला. अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या सावत्र पित्याला न्यायालयाने १४१ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

मलप्‍पुरम जिल्ह्यातील मांजेरी शहरातील फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अश्रफ एएम यांनी आरोपीला लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण (पोक्सो) कायदा, भारतीय दंड संहिता आणि बाल न्याय कायदा यातील विविध तरतुदींनुसार एकूण १४१ वर्षांची शिक्षा सुनावलीये.

न्यायालयाच्या २९ नोव्हेंबरच्या आदेशानुसार, दोषीला एकूण ४० वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. कारण ही त्याला सुनावण्यात आलेली सर्वोच्च शिक्षा आहे. यामध्ये म्हटलं की, वेगवेगळ्या तरतुदींनुसार दिलेल्या वेगवेगळ्या शिक्षा एकत्र चालतील. न्यायालयाने दोषीला 7.85 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आणि पीडितेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, गुन्हेगार आणि पीडिता हे मूळचे तामिळनाडूचे रहिवासी आहेत. तो या मुलीचा सावत्र पिता असून पीडितेचे 2017 पासून लैंगिक शोषण करत होता. एका मित्राच्या सांगण्यावरून पीडितेने अखेर पोलिसात तक्रार करणाऱ्या तिच्या आईला संपूर्ण कहाणी सांगितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

SCROLL FOR NEXT