Solapur Fight Video Saam Tv
क्राईम

Solapur Video: बिल मागितलं म्हणून हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

Solapur Fight Video: एका हॉटेल मॅनेजरला एका टोळक्याने बेदम मारहाण केलीय. बिल देण्याच्या वादावरुन या टोळक्याने मॅनेजरला मारहाण केली.

Bharat Jadhav

विश्वभूषण लिमये, साम प्रतिनिधी

बिल मागितलं म्हणून एका हॉटेल मॅनेजराला ४ ते ५ जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केलीय. या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाला असून हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरम्यान, मारहाण केल्यानंतर या टोळक्याने मॅनेजरकडे खंडणी देखील मागितली. याप्रकरणी बार्शी पोलीस स्टेशनमध्ये चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बार्शीतील एका हॉटेलमध्ये बिल देण्यावरून एका टोळक्याने मॅनेजरला तुफान मारहाण केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. मारहाणीची घटना मंगळवार २३ जुलैच्या रात्रीची आहे. रात्री पावणे आठ वाजता या टोळक्याने बिल मागितलं म्हणून मॅनेजरला बेदम मारहाण केली.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मारहाण करताना टोळक्याकडून २० हजार रुपयांची खंडणी देखील मागण्यात आली.

याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आलाय. सागर ओहोळ असं टोळक्यामधील एकाचं नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ च्या कलम १०९(१), ११५(२), ३२४(४), ३०८(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Winner: 'तन्वी कोलते हा ब्रॅण्ड बनून...'; 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी जिंकल्यावर तन्वी कोलते झाली भावूक

Belly Fat: सकाळी या 5 सवयी करा फॉलो, पोटाचा घेर होईल आठवड्यातच कमी

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १० दिवस, लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचे ₹३००० कधी येणार? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

Bhendwal Bhavishyvani 2026: यंदा देशात मुसळधार पाऊस, महापूर येणार; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT