Husband Kills Wife  Saam tv
क्राईम

Husband Kills Wife : संशयाचं भूत मानगुटीवर बसलं; साखरझोपेतच केली पत्नीची हत्या, गुपचूप रात्रीच उरकला अंत्यसंस्कार

husband kills wife in solapur News : सोलापुरात पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापुरातील तेलगावातील भीमा या भागात ही घटना घडली आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील तेलगाव भीमा येथे पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने तेलगाव भीमा येथे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

भाग्यश्री बसवराज कोळी असे हत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी फिर्यादी चंद्रकांत कोळी यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पती बसवराज आडव्याप्पा कोळी, शिवानंद आडव्यापा कोळी आणि गजानन आडव्यापा कोळी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे नेमंक प्रकरण?

बसवराज कोळी आणि भाग्यश्रीचा २०१४ साली विवाह झाला होता. मागील दोन वर्षांपासून कोळी कुटुंब निम्बर्गीतील शेतात राहत होतं. काही दिवसांपूर्वी बसवराज सासरवाडी लोणीला आला. त्यानंतर त्याने सासरवाडीला पत्नी काही काम करत नाही.ऐकत नाही. नेहमी भांडत असल्याची तक्रार दिली. त्यानंतर बसवराजने मेव्हणा चंद्रकांत कोळीला तेलगावला बोलावून घेतले.

बसवराजने मेव्हण्याला तुझ्या बहिणीचे चारित्र्य चांगले नसल्याचे सांगितले. निंबर्गी येथील तिचे अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. पत्नी २३ जूनला रविवारी रात्री झोपल्यानंतर बसवराजने तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांनी सांगितली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करत आहेत.

पोलीस पुढील तपासासाठी तेलगावला पोहोचले. बसवराजच्या भावाने भाग्यश्रीची हत्या केलेली जागा दाखवली. घटनास्थळी बांगड्याचे तुकडे पडलेले दिसले. फिर्यादीच्या बहिणीच्या डोक्यात दगड घातला, त्याठिकाणी फरशी फुटून खड्डा पडलेला दिसला. या घटनेनंतर फिर्यादीच्या भावजी आणि त्यांच्या भावांनी मृत भाग्यश्रीचे रक्ताने माखलेले कपडे, अंथरुने पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून जाळून टाकल्याचेही फिर्यादीने सांगितले. पतीने पत्नीची हत्या केल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर नेमका कधी चेक करावा? दिवसभरातील 'हा' टाइम सर्वात बेस्ट

Kitchen Hacks : मिक्सर, मसाले अन् डब्यांचा पसारा? 'या' ३ ट्रिक्सने किचन दिसेल चकाचक

SCROLL FOR NEXT