Solapur News Saam Tv News
क्राईम

Solapur Crime : धक्कादायक! चक्क न्यायाधीशांच्याच घरावर चोरट्यांचा डल्ला, २० तोळे सोन्यासह लाखोंचा ऐवज लंपास; बार्शीत खळबळ

Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पाथरी गावात धाडसी चोरीची घटना घडली असून चक्क न्यायाधीशांच्या घरीच चोरट्याने डल्ला मारला आहे.

Prashant Patil

विश्वभूषण लिमये, साम टिव्ही

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पाथरी गावात धाडसी चोरीची घटना घडली असून चक्क न्यायाधीशांच्या घरीच चोरट्याने डल्ला मारला आहे. मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या किचनच्या दरवाजाचं कुलूप तोडून घरातील ज्वारीच्या कोट्यातून जवळपास २० तोळे सोनं आणि ५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीश हे देवदर्शनासाठी कोल्हापूरला गेले असता ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाथरी येथील दिनेश गायकवाड हे सध्या वाशिम तालुक्यातील रिसोड येथे न्यायदंडाधिकारी असून सुट्टीनिमित्ताने ते गावी आले होते. त्यातच, धार्मिक कार्यक्रमनिमित्ताने ते कोल्हापूरला दर्शनासाठी गेले असता, त्यांच्या घरात चोरीची घटना घडली. याबाबत, त्यांच्या आई पद्मिनी मुकुंद गायकवाड यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यानं घरातील सोन्याचे दागिने अंदाजे किंमत १२ लाख २३ हजार रुपये आणि ५ हजार रोकड लंपास केल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

तक्रारीत काय म्हटलं आहे?

आमच्या घरी धार्मिक कार्यक्रम असल्यानं मुलगा, सुन आणि नातवंडे घरी पाथरी येथे आले होते. तसेच मुलगी रेश्मा तिच्या मुलांसह कार्यक्रमासाठी आली असून ती सध्या आमच्याकडेच राहण्यास आहे. धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दिनांक १५ मे रोजी रोजी मुलगा, सुन आणि नातवंडे असं सर्वजण देवदर्शनासाठी कोल्हापूर येथे गेले आहेत. काल दिनांक १६ मे रोजी रात्री १० वाजता मी आणि मुलगी रेश्मा, नातवंडे असे जेवण करून घराच्या हॉलमध्ये झोपलो होतो. हॉल व किचन-बेडरूममध्ये रिकामा पोर्च असल्याने किचनला बाहेरून कुलूप लावून नेहमी झोपतो. काल देखील आम्ही जेवण झाल्यानंतर किचनला बाहेरून कुलूप लावून झोपलो होतो. आज रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मी झोपेतून उठून हॉलचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून कडी लावल्याचं दिसून आलं. त्यामुळे मी खिडकीतून बाहेर पाहिलं असता किचन रुमचे कुलूप लावलेलं नव्हतं व दरवाजा उघडा दिसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात साखर उद्योगासाठी ३ हजार कोटींचे प्रकल्प - अमित शहा

खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर? ऑपरेशन टायगरनंतरच्या त्या एका ट्विटनं राजकारणात खळबळ

Gaganbawada Waterfalls : गगनबावड्याच्या हिरव्यागार दऱ्यांतील ५ निसर्गरम्य धबधबे, पाहा पावसाळ्यात खुलणारे नंदनवन!

PM Kisan 23rd installment : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! बँक खात्यात २००० रुपये जमा, स्टेप बाय स्टेप असं करा चेक

SCROLL FOR NEXT