Savdav Upsarpanch Beats Up Couple Saam Tv News
क्राईम

Sindhudurg Crime : प्रकाश बिडवलकर प्रकरण ताजं; तोवर दुसरी घटना उजेडात, सिंधुदुर्गात उपसरपंचाकडून दाम्पत्याला बेदम मारहाण

Couple Beaten up by Savdav Deputy Sarpanch : कुडाळ येथील हत्येच्या घटनेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण गरम असतानाच सावडाव येथील मारहाणीच्या घटनेनं सिंधुदुर्गात पुन्हा एकदा खळबळ माजलीय.

Prashant Patil

सिंधुदुर्ग : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असतानाच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अगदी तसाच प्रकार समोर आला असल्याचं आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहेत. या प्रकरणामध्येही संशयित मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याचे राजकीय संबंध असल्याचं समोर येतंय. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघाचे खासदार नारायण राणे, आमदार रवींद्र फाटक, आमदार निलेश राणे यांच्यासोबत आरोपी सिद्धेश शिरसाट याचे फोटो समोर आले आहेत. बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक आहे. २२ हजारासाठी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर यांना नग्न करत अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करणाऱ्या सिद्धेश शिरसाट याचा आका कोण? असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.

कुडाळ येथील हत्येच्या घटनेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण गरम असतानाच सावडाव येथील मारहाणीच्या घटनेनं सिंधुदुर्गात पुन्हा एकदा खळबळ माजलीय. कणकवली तालुक्यातील सावडाव ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नयना सावंत आणि वैभव सावंत यांना अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आलीय. ही मारहाण सावडाव ग्रामपंचायतचे उपसरपंच दत्ताराम काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मारहाणीनंतर जखमी दाम्पत्यांचे फोटो फेसबुक वर पोस्ट केलेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल बीडच्या दिशेने होतेय, आणि पोलिसांनी यात हस्तक्षेप नाही केला, तर मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याची बीडच्या दिशेने होणारी वाटचाल वाढेल. अशी शंका आपल्या मनात असल्याचं माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितलंय. याबाबत दत्ताराम काटे आणि अन्य सात जणांवर परस्पर विरोधी गुन्हे कणकवली पोलिसांनी दाखल केले आहेत. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्याक आलेली नाहीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT