Mumbai Crime google
क्राईम

Mumbai Crime: अंधेरीतील धक्कादायक घटना, 30 वर्षीय नराधामाने शाळकरी मुलीला जिवंत जाळलं

Andheri Crime: अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात रविवारी ३० वर्षीय व्यक्तीने १७ वर्षीय मैत्रिणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मुलगी गंभीरपणे जखमी झाली आहे.

Dhanshri Shintre

अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात रविवारी ३० वर्षीय एका व्यक्तीने १७ वर्षीय मैत्रिणीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेत पीडित मुलगी ६० टक्के भाजली असून, ती सध्या रुग्णालयात मृत्यूशी लढत आहे. पीडित मुलगी दहावीत शिकणारी विद्यार्थिनी असून अंधेरी पूर्व परिसरातील रहिवासी आहे.

आरोपी देखील याच परिसरात राहतो. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, दोघे गेल्या दीड वर्षांपासून एकत्र भेटत होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. स्थानिकांनी अनेक वेळा आरोपीला पकडून मुलीच्या पालकांना माहिती दिली.

स्थानिकांच्या तक्रारीनंतर, मुलीच्या आई-वडिलांनी तिला समज देत आरोपीला भेटणे थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपी संतापला आणि त्याच्या रागाच्या भरात मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा घृणास्पद कृत्य केला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे.

२ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता आरोपी पीडित मुलीच्या घराबाहेर गेला आणि तिला बाहेर बोलावले. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला, ज्यामुळे आरोपीने तिच्यावर पेट्रोल टाकून आग लावली. स्थानिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून मुलीला वाचवले, मात्र आगीत आरोपीचे हात भाजले. मुलीच्या पालकांनी त्वरित पोलिसांना कळवले आणि मुलीला कूपर रुग्णालयात दाखल केले. मुलीची प्रकृती गंभीर असून ती सध्या मृत्यूशी लढत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कठोर कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट ८ लाख रुपये मिळणार, राज्य सरकारने सांगितले सत्य

Tulajapur News: तुळजाभवानी मंदिर परिसरात पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Diya Cleaning Tips : दिवाळीपूर्वी जुन्या पणत्या अन् समई करा नव्यासारखी लख्ख, 'ही' घरगुती ट्रिक २ मिनिटांत करेल काम

Maharashtra News Live Update: जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून खा. उदयनराजे भोसले यांचा अर्ज मागे

Hand Exercises : हाताच्या बोटांमध्ये वारंवार सुन्नपणा जाणवतोय? 'हे' ६ व्यायाम वेळीच करा,नाहीतर....

SCROLL FOR NEXT