क्राईम

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

Kalyan Horror Crime News : कल्याणमध्ये आंतरजातीय विवाहाच्या वादातून एका काकाने भाच्यावर आणि वहिनीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Bharat Jadhav

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

कल्याण वाडेघर परिसरात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. दुसऱ्या जातीतील मुलीशी लग्न करण्याच्या कारणावरून काकांनीच आपल्या पुतण्यावर आणि त्याच्या आईवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणाचे रविवारी लग्न होणार होते. मात्र, तो दुसऱ्या जातीतील मुलीशी विवाह करत असल्यामुळे कुटुंबात वाद निर्माण झाला. या वादातून संतप्त झालेल्या काकांनी पुतण्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला.

इतकेच नव्हे तर तीक्ष्ण हत्याराने त्याला जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. हल्ल्यादरम्यान मुलाची आईमध्ये आल्याने तिच्यावरही निर्दयीपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुक्मिणीबाई हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच बरोबर पीडित तरुणाच्या गाडीचीही दगडाने तोडफोड करण्यात आली आहे यामागे आंतरजातीय विवाह हेच एक कारण आहे की आणखीन कोणते कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

संतोष विजय शेलार असं तरुणाचे नाव आहे. संतोष शेलार हा दुसऱ्या जातीमधील एका मुलीशी लग्न करणार होता. ही गोष्ट त्यांच्या काका-चुलत्यांना आवडली नाही. प्रतिष्ठा धुळीस जाईल म्हणून त्यांनी थेट पुतण्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याला जीव मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. संतोषवर चॉपर आणि लोखडी रॉडनं हल्ला केला गेला.

वितेश रामदास शेलार असे हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. या हल्ला प्रकरणी संतोष शेलार म्हणाले की, काका चुलत्याना माझं लग्न मान्य नाही. मी दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न करत असल्यानं त्यांना ते आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर चॉपर आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. आईलाही मारहाण केली आहे. आईला पोटात आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. माझ्या मानेवर चॉपरचा वार करण्याच्या प्रयत्नात होते.परंतु मी त्यांचा हात धरून ठेवल्यानं वाचलो नाहीतर मला जीवे मारू टाकलं असतं, असं संतोष म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

Abhishek Sharma : १० षटकार, १० चौकार अन् २०० चा स्ट्राईक रेट; अभिषेकच्या शतकी तडाख्यात दिल्ली उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT