Bhandara Crime News Saam Tv
क्राईम

Bhandara Crime : आंतरजातीय विवाहातून २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला मृतदेह

Bhandara Crime News : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात २५ वर्षीय तरुणाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला आहे. आंतरजातीय प्रेमविवाहातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • मोहाडी तालुक्यात तरुणाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळला

  • दीड महिन्यांपूर्वी केलेला आंतरजातीय प्रेमविवाह संशयाच्या केंद्रस्थानी

  • हत्या अत्यंत क्रूर व नियोजनबद्ध असल्याचा प्राथमिक अंदाज

  • गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

शुभम देशमुख, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथे आज सकाळी एका २५ वर्षीय तरुणाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आकाश शेंडे असे या मृत तरुणाचे नाव असून, ही हत्या प्रेमविवाहाच्या रागातून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, आकाश शेंडे याने दीड महिन्यापूर्वी गावातीलच एका मुलीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या लग्नाला मुलीच्या कुटुंबाकडून विरोध असल्याची चर्चा गावात होती. आज सकाळी गावाबाहेर आकाशचा मृतदेह अत्यंत विदारक आणि छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला.

शरीरावरील जखमांचे स्वरूप पाहता, ही हत्या अत्यंत क्रूरपणे आणि नियोजनबद्ध रितीने केल्याचे दिसून येते.घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मृत्यूचे नेमके कारण आणि हत्येसाठी वापरलेले हत्यार शोधण्याचे काम सुरू आहे.आकाशने केलेल्या आंतरजातीय विवाहामुळेच ही हत्या झाली असावी, असा दाट संशय मृताच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.या घटनेनंतर बेटाळा गावात संतापाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT