Dhule Crime News Saam TV
क्राईम

Dhule Crime News: धुळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट; रात्रीच्या अंधारात थेट एटीएमवर मारला डल्ला, लाखोंची रोकड लंपास

Crime News: पोलीस प्रशासनातर्फे विविध तपास यंत्रणांसह या चोरट्यांचा शोध घेतला जात असून, रात्रीच्या गस्ती पथकाला या संदर्भातील माहिती का कळू शकली नाही? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Ruchika Jadhav

भूषण अहिरे

Shindkheda News:

शिंदखेडा शहरात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. चोरांच्या टोळक्याने थेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर डल्ला मारला आहे. लाखो रुपये चोरून चोरटे लंपास झाले आहेत. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी येथे धाव घेतली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यामध्ये बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम फोडून जवळपास पाच ते सहा लाख रुपये चोरून चोरट्यांनी पोबारा केला.

रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी शिंदखेडा पोलिसांसह बँकेचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत. पोलीस प्रशासनातर्फे विविध तपास यंत्रणांसह या चोरट्यांचा शोध घेतला जात असून, रात्रीच्या गस्ती पथकाला या संदर्भातील माहिती का कळू शकली नाही? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.

लातूमध्येही चोरांचा सुळसुळाट

लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केलीय. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीमधील २१ मोबाईल आणि ११ दुचाकी असा एकूण ८ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि चोरीच्या गुन्ह्यातील ६ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत जेल बंद केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT