Sharad Mohol News Saam TV
क्राईम

Sharad Mohol News: शरद मोहोळ हत्या प्रकरणात 2 नामवंत वकील कसे अडकले? रडत रडत कोर्टात दिली माहिती

Sharad Mohol case update: यावेळी आरोपी दोन वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ॲड रवींद्र पवार आणि ॲड संजय उड्डाण अशी वकिलांची नावे आहेत.

Ruchika Jadhav

Sharad Mohol Case:

शरद मोहोळ हत्या प्रकरणामुळे संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून दररोज नवीन माहिती समोर येतेय. आतापर्यंत एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आलीये. यातील २ जण वकील आहेत. या वकीलांना न्यायालयात आपली बाजू मांडताना अश्रू अनावर झालेत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोहोळ खून प्रकरणात ७ तरुणांसह २ वकिलांना पोलिसांनी अटक केलीये. शरद मोहोळ खून प्रकरणामधील आरोपींना काल न्यायालयात हजर केले होते. यावेळी आरोपी दोन वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ॲड रवींद्र पवार आणि ॲड संजय उड्डाण अशी वकिलांची नावे आहेत.

वकिलास न्यायालयातच अश्रू अनावर

"आम्हाला आरोपींचा फोन आला की, त्यांनी खून केला असून, त्यांना सरेंडर व्हायचे आहे. आम्हीही त्यांना तोच सल्ला देत, त्याची माहिती पोलिसांना फोनद्वारे कळविली" असे या वकिलांनी न्यायलायात सांगितले.

"आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही आम्ही तेच सांगितले. पण पोलिसांनी आमचे ऐकले नाही.", अशा शब्दात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका वकिलाने आपली बाजू मांडली.

"आम्ही १५ वर्ष वकीली व्यावसायात आहोत, आम्ही काहीही केले नाही", असे सांगताना दुसऱ्या वकिलास न्यायालयातच अश्रू अनावर झाले होते.

CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

पुण्यात शरद मोहोळ कोथरुडमधील सुतारदरा परिसरातील आपल्या घरातून बाहेर निघाला होता. त्यावेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेचं CCTV फुटेज देखील समोर आलं आहे. व्हिडीओमध्ये शरद मोहोळवर कशा पद्धतीने गोळ्या झाडण्यात आल्या हे स्पष्ट दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : भिवंडीत ठाणे महानगर PNG गॅसची पाईपलाइन फुटली

Raigad : रायगड हादरले! आईने ४ मुलांना विष पाजून स्वतःही संपवलं आयुष्य; नेमकं झालं काय?

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

Shocking : भयंकर! जन्मदात्या बापाने १९ वर्षीय मुलीची पोलीस ठाण्यात केली निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर

Accident : राजनाथ सिंह यांच्या कुटुंबावर शोककळा; पुतण्याचा भीषण अपघातात मृत्यू

SCROLL FOR NEXT