Satara Judge Bribe Case Saam Tv
क्राईम

Judge Bribe Case: धक्कादायक! जामिनासाठी न्यायाधीशांनीच घेतली पाच लाख रुपायांची लाच

Satara Judge Bribe Case: सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जामीन देण्याच्या निर्णयासाठी फिर्यादीकडून लाच घेतल्याची बाब समोर आलीय.

Bharat Jadhav

ओमकार कदम , साम प्रतिनिधी

सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा, यासाठी अनेकजण न्यायाधीशांकडे न्यायाची याचना करतात. मात्र न्याय देणाऱ्या न्यायाधीशांनीच लाच घेतल्याची घटना साताऱ्यात घडलीय. जामीन देण्यासाठी न्यायाधीशांनी ५ लाख रुपयांची लाच घेतल्याची बाब उघडकीस आलीय. याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी करवाई करत सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांवर गुन्हा दाखल केलाय. न्यायाधीशांना अटक करण्यासाठी उच्च न्यायालयाला पत्र पाठवण्यात आले असून हायकोर्टाच्या आदेशानंतरच न्यायाधीशांना अटक केली जाणार आहे.

जिल्हा आणि सत्र न्यायाधिश धनंजय निकम यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हाती आलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी न्यायाधिशांनी थेट लाच मागतिली. सातरा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी जामीन देण्यासाठी फिर्यादीकडून ५ लाख रुपयांची लाच मागितली. विशेष म्हणजे जेथे नागरिकांना न्याय मिळतो त्या पवित्र न्यायालयाच्या अवारातच न्यायाधीशांनी लाच मागितल्याची माहिती समोर आलीय.

न्यायाधीशांनी फिर्यादीकडून न्यायालयाच्या आवारात लाच मागितली होती. लाचचे पैसे मध्यस्थींमार्फत घेण्यात आले होते. एका हॉटेलमध्ये लाचचे पैसे घेण्यात येत होते. त्यावेळी पोलिसांनी साफळा रचत पैसे घेणाऱ्या मध्यस्थींला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु मध्यस्थी पैसे तेथेच टाकून तेथून पळून गेले. दरम्यान याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT