crime News Saam Tv
क्राईम

Crime News : साताऱ्यातील कराडमध्ये माणुसकीला काळिमा, अनाथ आश्रमाच्या नावावर वेश्या व्यवसाय; दोघांना बेड्या

Raid On Prostitution Business : पोलीस निरीक्षक महिंद्र जगताप यांनी थेट कारवाई कर आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Namdeo Kumbhar

Satara Crime News : राज्यभरात अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असताना साताऱ्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कराडातील टेंभू गावात माणूसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अनाथ आश्रमाच्या नावाखाली एका महिलेकडून देह व्यापार करून घेतला जात होता. याप्रकरणी

पोलीस निरीक्षक महिंद्र जगताप यांनी थेट कारवाई कर आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. अभिनेता किरण माने यानेही याप्रकरणावर बोट ठेवत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.

घटना काय घडली ?

सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यामधील टेंभू गावातील धक्कादायक घटना समोर आली आहे. आई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या निराधार आश्रमामध्ये आश्रम चालक महिलेकडून लहान मुलींवर अन्याय करण्यात येतोय. आश्रम शाळेतील मुलींना अवैद्य दारू विक्री करण्यास भाग पाडण्याचा प्रकार समोर आलेला आहे, तसंच आधार संस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना वेश्या व्यवसायमध्ये गुंतवलं जात असल्याची तक्रार एका महिलेन केली आहे.

या आश्रमात असलेल्या मुलीना पाय दाबायला लावणे, मारहाण करणे अशाप्रकारचे व्हिडिओही समोर आले आहेत. अनाथ आश्रम चालवणाऱ्या महिलेकडून निराधार महिलांना सहारा देण्याचा बहाण्याने घरी बोलवून त्यांना जबरदस्तीने देह विक्री करण्यास भाग पाडलं जात आहे. दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे.

किरण माने यानं काय आरोप केला ??

कराडजवळील टेंभू गांवातल्या 'छत्रछाया' या निराधार मुलींसाठीच्या आश्रमात चालणारा लैंगिक शोषणाचा भयानक प्रकार उघडकीला आला आहे ! आश्रम चालवणारी समाजसेविकाच या निराधार अल्पवयीन मुलींना अनेक बड्या धेंडांबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती.

या सेक्स स्कँडलमध्ये अनेक बडे पोलीस अधिकारी असल्याचा संशय आहे. तसेच एका मोठ्या राजकारण्याच्या भावाचाही यात समावेश असल्याची चर्चा आहे. असो. आज लाडकी बहिण योजनेच्या चकचकीत इव्हेन्टसाठी 'चीप' मिनिस्टर कोल्हापुरात येणार आहेत. गृहमंत्री नेहमीप्रमाणे 'लापता' आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT