SANGLI NEWS: MOTHER AND TWO-YEAR-OLD SON DIE IN DESHING VILLAGE saam tv
क्राईम

Crime News: दोन वर्षाच्या चिमुकल्यासह आईने विहिरीत घेतली उडी; मायलेकाच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

Sangli News: सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग गावात एका महिलेनं आपल्या मुलासह विहिरीत उडी घेत जीव दिला. मायलेकाच्या मृत्यूनं जिल्ह्यात खळबळ उडालीय.

Bharat Jadhav

  • सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथे दुर्दैवी घटना घडली.

  • २५ वर्षीय प्रीती मनोहर राठोड आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा श्रीहंन यांचा मृत्यू झाला.

  • मृत महिला आणि तिचे कुटुंब मूळचे विजापूर येथील रहिवासी होते.

विजय पाटील, साम प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथे धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादानंतर ऊसतोड मजूर महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत महिलेचे नाव प्रीती मनोहर राठोड (वय २५) असून मुलगा श्रीहंन मनोहर राठोड (वय २) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही मूळचे विजापूर येथील रहिवासी असून ऊसतोडीसाठी देशिंग येथील देसाई वस्ती परिसरात आले होते.

किरकोळ वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काल दुपारपासून महिला आणि तिचे बालक बेपत्ता असल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला होता. आज नंदकुमार घोरपडे यांच्या मालकीच्या विहिरीतील पाण्यावर महिलेची चप्पल तरंगताना दिसली. त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता महिला आणि बालकाचे मृतदेह आढळून आला.. या घटनेमुळे देशिंग परिसरात शोककळा पसरली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips : कापलेला लिंबू वाळू नये म्हणून वापरा या सोप्या ट्रिक्स; रसही राहील अनेक दिवस ताजा

बीडमध्ये भरदिवसा थरार! घरातून उचलून आणत कारमध्ये कोंबलं; दिवसाढवळ्या ३५ वर्षीय महिलेचं अपहरण

Maharashtra News Live Update: धुळे एसटी परिवहन विभागाच्या महसुलामध्ये यंदाची दिवाळीत भरगोच वाढ

No Onion Recipe : कांदा न वापरता बनवा 5 भाज्या, ज्या चवीसह आरोग्यालाही देतील फायदा

अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, परदेश दौरे बंद करा, गावोगावी फिरा, तरच नंबर लागेल

SCROLL FOR NEXT