Sangli Crime News Saam Tv
क्राईम

Sangli News : मोबाईल स्क्रीन गार्डवरुन वाद, चाकू-कोयत्याचे सपासप वार; कामगाराची निर्घृण हत्या

Sangli Crime News : सांगलीच्या बस स्थानकाजवळील मोबाईल दुकानातमध्ये काम करणाऱ्या कामगाराची हत्या करण्यात आली आहे. मोबाईल स्क्रीन गार्डच्या वादातून चार तरुणांनी कामगाराचा जीव घेतला.

Yash Shirke

विजय पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

Sangli Crime News : सांगलीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरात मोबाईल स्क्रीन गार्डच्या खरेदीवरुन एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना सांगली शहरातील बस स्थानकाजवळील मोबाईल दुकानात ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला जेरबंद केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीच्या बस स्थानकाजवळ असलेल्या भैरवनाथ मोबाईल शॉपमधील एका कामगारावर चार तरुणांनी जीवघेणा हल्ला केला. चाकू आणि कोयत्याने वार करत त्यांनी कामगाराची हत्या केली. १०० रुपयांचे मोबाईल स्क्रीन गार्ड ५० रुपयांना न दिल्याच्या रागात ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

जीवघेण्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव विपुल अमृतपुरी गोस्वामी आहे अशी माहिती समोर आली आहे. आज (२६ जानेवारी) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. मोबाईल स्क्रीन गार्डची कमी किंमतीत देण्यास नकार दिल्याने चार आरोपींनी या कामगाराचा जीव घेतला. या हल्ल्यानंतर दुकानासमोर बघ्यांची मोठी गर्दी झाली.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधिकक्ष रितू खोकर, उपविभागीय अधिकारी विमला एम यांनी घटनास्थळी भेट दिली. पाहणी केल्यानंतर त्यांनी लगेच तपासाला सुरुवात केली. अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपींना अटक केली. या घटनेमुळे सांगली बस स्थानक परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT