Sangli Crime Saam tv
क्राईम

Sangli Crime: धक्कादायक! बांधकाम कामगारावर जीवघेणा हल्ला, कोयत्याने डोक्यात वार; हल्लेखोर फरार

Maharashtra Breaking News: बांधकाम कामगाराचा कोणताही संबंध नसताना त्याच्यावर हल्ला करून जखमी केल्याने बांधकाम कामगारांकडून या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे.

Gangappa Pujari

सांगली, ता. ८ जून २०२४

बांधकाम करण्यासाठी गेलेल्या कामगारावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सांगलीमध्ये घडली आहे. जमीर अब्दुल शेख (वय 36) राहणार चांद कॉलनी मिरज असे जखमी बांधकाम कामगाराचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांधकाम करण्यासाठी गेलेल्या कामगारावर कोयत्याने जीव घेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. जमीर अब्दुल शेख असे जखमी बांधकाम कामगाराचे नाव आहे. जमीर शेख हे रेवनी गल्ली येथे अन्वर जमादार यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी गेले होते. यावेळी शेजारी राहणारे हल्लेखोर राजू जमादार आणि त्याच्यासोबत असलेले इतर तीन ते चार जणांनी जमीर शेख यांच्याशी वाद घालून कोयत्याने डोक्यात वार करून जखमी केले आहे.

या घटनेनंतर हल्लेखोर हल्ला करून पळून जाण्यात यशस्वी झाले. जमीर शेख या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर नागरिकांनी त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अन्वर जमादार आणि त्याचे शेजारी राजू जमादार यांच्यामध्ये जागेचा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.

परंतु बांधकाम कामगाराचा कोणताही संबंध नसताना त्याच्यावर हल्ला करून जखमी केल्याने बांधकाम कामगारांकडून या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मिरज शहर पोलिस अधिक तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT