Sangli Crime Saam Tv
क्राईम

Sangli Crime : सांगली हादरलं! MBBS च्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार, ३ मित्रांनी केला घात

Sangli Police: सांगलीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. आरोपींमधील दोन तरुण पीडित तरुणीचे मित्र आहेत.

Priya More

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिघांनी तरुणीसोबत हे भयंकर कृत्य केलं. या प्रकरणी सांगली पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे सांगली हादरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरूणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. तिघांनी पीडित तरूणीला गुंगीचे ड्रिंक देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी आणि तरुणी एकाच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतात. या तरुणांनी चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने तरुणीला आपल्या रूमवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संशयित ३ तरुणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पैकी दोघे आणि पीडित तरुणी हे शहरातल्या एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होते. मंगळवारी पिडीत तरुणीला चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने तिच्या २ मित्रांनी त्यांच्या रूमवर नेले. त्यानंतर तरुणीला ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देण्यात आले.

पीडित तरुणीला गुंगी आल्यानंतर आरोपी तरुणांनी दारू प्यायली. दारूच्या नशेत त्यांन आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर शुद्धीवर आलेल्या तरुणीने आपली सुटका करत थेट विश्रामबाग पोलिस ठाणे गाठले. तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिघांनाही अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावली

BJP Setback : भाजपची डोकेदुखी वाढली! माजी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, थेट पक्षावर काढला राग

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड; तीन आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारू विक्रीबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

SCROLL FOR NEXT