Sangli District Bank Scam:  Saamtv
क्राईम

Sangli DCC Bank Scam: सांगली जिल्हा बँकेत मोठा घोटाळा; सहा शाखांमध्ये २. ४३ कोटींचा अपहार; ८ जण निलंबित

Sangli District Bank Scam: या घोटाळयाप्रकरणी एकूण आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून २१९ शाखांमध्ये जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून तपासणी मोहीम देखील सुरू आहे.

विजय पाटील

सांगली, ता. २६ मे २०२४

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील दुष्काळ निधी बाबत ६ शाखांमध्ये एकूण २ कोटी ४३ लाखांचा घोटाळा झाला असल्याचा उघडकीस आले आहे. या प्रकरणी संबंधित शाखेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करत ८ जणांना निलंबित करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील दुष्काळनिधीबाबत ६ शाखेत एकूण दोन कोटी ४३ लाखांचा घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळयाप्रकरणी एकूण आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून २१९ शाखांमध्ये जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून तपासणी मोहीम देखील सुरू आहे.

त्यामुळे दोन दिवसाच्या तपासणीनंतर दुष्काळ आणि अवकाळ निधीवर मारण्यात आलेला डल्ल्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र जिल्हा बँकेतल्या या दुष्काळ आणि अवकाळ मदत निधीतील गैरव्यवहार प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये सर्व शाखांची तपासणी केली तर हीच रक्कम 25 ते 30 कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या प्रकरणी सहकार विभागामार्फत चाचणी लेखा परीक्षण करण्यात यावे. आणि सबधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाकडून करण्यात येत आहे. याबाबतीत आम्ही सहकार आयुक्त पुणे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करणार असल्याचेही स्वतंत्र भारत पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

परप्रांतीय रिक्षाचालकांसाठी मराठीची कार्यशाळा, मराठी शिकवणाऱ्यावरून भाजप-शिंदेसेनेत स्पर्धा

Tuesday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; 'या' राशींच्या लोकांचे प्रेमसंबंध सुधारणार, जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘भरत’ सिंहाची प्रकृती चिंताजनक

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT