jaipur crime saam
क्राईम

Rajsthan Crime: ख्रिसमस पार्टीदरम्यान २ जोडप्यांमध्ये वाद; हॉटेलबाहेर येताच महिलेला कारखाली चिरडलं

jaipur Crime : जयपूरमध्ये रेस्टॉरंटसमोर कार चालकाने एका जोडप्याला चिरडल्याची घटना घडलीय. ही घटना जवाहर सर्कल परिसरातील गिरधर रोडवर घडलीय.

Bharat Jadhav

man run car over woman:

जयपूरमध्ये रेस्टॉरंटसमोर कार चालकाने एका जोडप्याला चिरडल्याची घटना घडलीय. यात महिलेचा मृत्यू झाला आहे तर महिलेसोबत असलेला तिचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जवाहर सर्कल परिसरातील गिरधर रोडवर घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून आरोपी कार चालकाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. (Latest News)

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी कार चालकाचं नाव मंगेश असल्याचं सांगितलं जात आहे. हा राडा जयपूरमधील (Jaipur) एका आलिशान परिसरात असलेल्या रेस्टॉरंटमध्ये झाला. येथे दोन जोडपे जेवणासाठी आले होते. हल्ल्यात जखमी झालेला प्रियकर हा रेस्टॉरंटचा (restaurant) पार्टनर आहे. तो आणि त्याची मैत्रीण रेस्टॉरंटच्या छतावर चालू असलेलं बांधकाम पाहण्यास गेले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तेथून आल्यानंतर ते रात्री ११ वाजता रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आले. त्यावेळी आरोपी आणि त्याची प्रेयसी तेथे बसली होते. मृत महिला आणि तिचा प्रियकर तेथे आल्यानंतर आरोपीने त्यांना टोमणे मारणं सुरू केलं. रेस्टॉरंट पार्टनर असलेला मृत महिलेचा प्रियकराने आरोपीला टोकलं. त्यावर आरोपी म्हणाला की, तो तिला आधीपासून ओळखतो.

दरम्यान हॉटेल पार्टनर देखील या हल्ल्यात जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. पोलिसांनी त्याचा जबाब घेऊन गुन्हा दाखल केलाय. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वाद झाल्यानंतर ते चौघेजण एकत्र बसले आणि साधारण गप्पा करू लागले. त्यानंतर आरोपीने त्या महिलेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता.

यानंतर पहाटे पाचच्या सुमारास उमा आणि राजकुमार रेस्टॉरंटमधून बाहेर पडले आणि उमाने कॅब बुक केली. त्यावेळी आरोपी त्याच्या प्रेयसीसोबत तेथे आला. तेव्हा परत त्यांच्यात वाद झाला. पोलिसांनी सांगितले की, भांडण वाढत गेल्याने आरोपी तेथून निघून गेला. त्यानंतर तो तेथे त्यांची कार घेऊ आला. त्याने कॅबची वाट पाहत बसलेल्या महिलेवर आणि तिच्या प्रियकराला चिरडलं. पोलिसांनी सांगितले की,रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. तर तिच्या प्रियकरावर अद्याप उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: दादा तुमचा निर्णय चुकला...; अजित पवारांच्या आठवणीच उपमुख्यमंत्री शिंदे भावुक

कल्याण डोंबिवलीत कोळी समाजाचा रोष; बांगलादेशी मच्छी विक्रेत्यांवर तात्काळ कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: लातूरच्या पोहरेगाव परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे मोठं नुकसान

Avoid coconut paste in vegetables: कोणत्या भाज्यांमध्ये खोबऱ्याचं वाटण वापरू नये?

Shocking: बीचवर रोमान्स करताना भयंकर घडलं, लाटेसोबत कपल गेलं वाहून, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT