Maharashtra Crime News:  Saam tv
क्राईम

Raigad Crime News: तीन तरुणांमध्ये वाद अन् एकाची निर्घृण हत्या, भयंकर घटनेने रायगड हादरलं; हल्लेखोर फरार

Maharashtra Crime News: मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला होता. धक्कादायक म्हणजे गंभीर जखमी व्यक्तीला उपचार देण्याएवजी तशाच जखमी अवस्थेत सोडून दोन्ही आरोपी फरार झाले.

Gangappa Pujari

सचिन कदम, ता. १३ सप्टेंबर

Raigad Crime: तीन तरुणांमधील वाद आणि त्यानंतर झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रायगडमध्ये घडली. माणगाव रेल्वे स्थानकानजिक घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून याप्रकरणी दोन अनोळखी आरोपींविरोधात माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तीन व्यक्तींमधील भांडण आणि मारामारीनंतर एकाचा मृत्यू झाल्याची घटना माणगाव रेल्वे स्थानकानजिक दुकानाच्या शेडमध्ये घडली. या परिसरात गुरुवारी सकाळी अंगावर हत्याराच्या जखमा असलेला मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करत असताना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. यामध्ये भांडण आणि मारामारीची घटना कैद झाली होती. ज्यावरुन या प्रकरणाचा खुलासा झाला.

बुधवारी (ता. ११ सप्टेंबर) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास माणगाव रेल्वे स्थानकानजिक दुकानाच्या शेडमध्ये तीन तरुणांमध्ये वाद झाला त्यानंतर ही मारामारीची घटना घडली. या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला होता. धक्कादायक म्हणजे गंभीर जखमी व्यक्तीला उपचार देण्याएवजी तशाच जखमी अवस्थेत सोडून दोन्ही आरोपी फरार झाले.

वेळेत उपचार न मिळाल्यानेच या तरुणाचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले चाकूसारखे हत्यार, रक्त पुसून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्यात तिहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. त्यानंतर आता आणखी एक हत्येची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

SCROLL FOR NEXT