Raigad Crime Saam TV
क्राईम

Raigad Crime : लॉजच्या तरूण मॅनेजरची गुप्तांग कापून निर्घृण हत्या; पेणजवळील वडखळ हादरले

Raigad Crime News : लॉजचा मॅनेजर ४० वर्षांचा आहे. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर गुप्तांग कापले.

साम टिव्ही ब्युरो

Raigad Crime News:

रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका लॉजच्या व्यवस्थापकाचा गळा आणि गुप्तांग कापून निर्घृण हत्या करण्यात आली. पेण तालुक्यातील वडखळ येथे ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉजचा मॅनेजर ४० वर्षांचा होता. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचे गुप्तांग कापले. विचित्र अवस्थेत मृतदेह जमिनीवर पडला होता. या हत्येची घटना उघड झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तींनी अशा प्रकारे निर्घृण हत्या केल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी, असं स्थानिकांचं म्हणणे आहे.

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

अकोल्यात दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळले; घातपाताची शक्यता

अकोल्यात देखील अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आलेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. आढळलेल्या मृतदेहांमध्ये एकाचे वय 35 वर्षे आणि एकाचे वय 65 वर्षे आहे.

अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील चौहटा बाजार भागात हे दोन्ही मृतदेह आढळून आलेत. समाधान शंकर ढिगे (वय 65) आणि निलेश राणे (35)अशी मृतकांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, समाधान यांचा रस्त्यावर पुलावरुन खाली पडून मृत्यू झाला असावा. तर निलेश राणे यांनी कौटुंबिक कलहातून विषप्राशन करून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली आहे. तरीही दोघांचे मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून घातपाताची शक्यताही वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT