Pune Crime News Saam Tv
क्राईम

Shocking News : पुणे हादरलं! शाळेतील मुलीला फिरण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवलं, ५० वर्षाच्या नराधमाने केले घाणेरडं कृत्य

Pune Crime News : पुण्यात एका दिवशी दोन तरुणींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड सिटी आणि विश्रांतवाडी भागात घडलेल्या या प्रकरणांनी नागरिकांमध्ये संताप निर्माण केला आहे. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई सुरू केली आहे.

Alisha Khedekar

पुण्यात एका दिवशी दोन तरुणींवर अत्याचार

नांदेड सिटी प्रकरणात तरुणीचा पाठलाग करत अश्लील वर्तन

विश्रांतवाडी येथे शाळकरी मुलीशी गैरवर्तन

दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांकडून तपास सुरू

पुण्यातून धक्कदायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या तरुणींच्या अत्याचाराची बातमी समोर आली आहे. एका घटनेत तरुणीचा पाठलाग करत तिच्याशी अश्लील वर्तन करण्यात आलं. तर दुसऱ्या घटनेत शाळकरी मुलीला दुचाकीवर फिरवण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत एका व्यक्तीने गैरवर्तन केलं. एकाच दिवशी घडलेल्या या घटनांनी पुण्यासारख्या शिक्षित शहराची झोप उडवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नांदेड सिटी परिसरात शनिवारी रात्री एक तरुणी जेवणानंतर फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडली. यादरम्यान ती सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी परिसरातून चालत असताना, या तरुणीचा रस्त्याच्या कडेला एका बाकावर बसलेल्या व्यक्तीने पाठलाग सुरू केला. तरुणी काहीशी पुढे गेल्यानंतर आरोपीने तिचा हात पकडून तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरडा करताच आरोपी तिथून पळून गेला. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला आहे.

तर दुसऱ्या प्रकरणात पुण्यातील विश्रांतवाडी इथे एका शाळकरी मुलीला ५० वर्षीय नराधमाने दुचाकीवर फिरवण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याने चिमुकलीशी अश्लील वर्तन केलं. घडलेला सगळा प्रकार चिमुकलीने पालकांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली.

या तक्रारीची तत्काळ दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत श्रीराम आल्हाट नावाच्या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांमध्ये पुढील तपास सुरू केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.दरम्यान या दोन्ही गुन्हेगारांना काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवींचं मंदिर आजपासून दर्शनासाठी खुलं

Friday Horoscope: या राशींनी कोणताही निर्णय घेताना घाई करू नका; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Friday Horoscope : कामाचा ताण वाढेल; 5 राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा?विरोधात असताना तुम्ही काय केलं? राज ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

Fact Check: राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या? गाडीतील गुप्त कप्यात लपवली कोट्यवधींची रोकड?

SCROLL FOR NEXT