FIR Against BJP corporator Rajendra Shilimkar  Saam Tv
क्राईम

Pune News : शंकर महाराज मठात भाजप नगरसेवकाचा राडा; ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल, VIDEO व्हायरल

FIR Against BJP corporator Rajendra Shilimkar in Pune : पुण्यात भाजप नगरसेवकाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजेंद्र शिळीमकर यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला गेलाय.

Rohini Gudaghe

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

पुण्यातून मोठी बातमी समोर येतेय. पुण्यातील भाजप नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यावर सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजेंद्र शिळीमकर, मुलगा अथर्व शिळीमकर, पुतण्या अर्चित शिळीमकर, महेश शिळीमकर या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

शंकर महाराज मठात रूद्राभिषेक करण्याकरीता मज्जाव करून, मारहाण केल्याप्रकरणी चेतन आरडे यांचं उपोषण सुरू होतं. उपोषणानंतर पोलिसांकडून शिळीमकर कारवाई करण्यात आलीय. शंकर महाराज मठात रूद्राभिषेक करण्याकरीता मज्जाव करण्यात आला (FIR Against BJP corporator) होता. त्यानंतर अश्लील जातीय वाचक शिवीगाळ आणि बेदम मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या पाच दिवसापासून चेतन आरडे हे पुणे स्टेशन समाज कल्याण विभागासमोर उपोषणास बसले आहे.

चेतन आरडे हे मातंग समाजातील असून तळजाई वसाहत येथे वास्तव्यास आहे. २० जून २०२४ रोजी सातारा रोड येथील शंकर महाराज मठामध्ये आरडे हे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ देखील आले होते. मोहोळ यांच्यासाठी रुद्राभिषेक चालू होता. रुद्राभिषेक सुरू असताना आरडे यांना ही आत (Fight video) जायचं होतं. परंतु, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांचे बंधू महेश शिळीमकर, अथर्व राजेंद्र शिळीमकर, अर्चित महेश शिळीमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जातीय द्वेषातून चेतनला मारहाण केली.

याप्रकरणी चेतन यांनी ११२ क्रमांक डायल करून पोलिसांत तक्रार केली, परंतु तेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले (Pune News) नव्हते. यावेळी चेतन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी गेला होता. तेव्हा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही प्रकारे जबाब आणि तक्रार नोंदवून घेतली नाही.

त्यामुळे पीडित हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसले आहे. यावेळी मारहाण आणि शिवीगाळ करण्याऱ्या संबंधित व्यक्तीपासून जीवितास धोका (BJP corporator Rajendra Shilimkar) आहे. त्यांच्यावरती अनुसूचित जाती कायदा १९८९ सुधारित २०१६ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. मला न्याय द्यावा, असं आरडे यांनी लेखी पत्र दिलं होतं. पत्राची दखल घेत गुन्हा दाखल केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avirat Patil: घे भरारी! इंजिनीअर झाला, पण पुण्याच्या FTII मध्ये गेला; जळगावच्या तरुणाच्या पहिल्याच लघुपटाला 'सुवर्ण कमळ'

म्हशीला झालं रानगव्यापासून रेडकू, दिसतंय सुद्धा रानगव्यासारखंच | VIDEO

Poha Chivada: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरीच बनवा चटपटीत अन् कुरकुरीत पोहा चिवडा, रेसिपी एकदा वाचाच

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील दुकाने राहणार 24 तास खुली, कोणती दुकाने असतील बंद

Maharashtra Politics : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत पोसलेली कुत्री; कुणी केली जहरी टीका?

SCROLL FOR NEXT