Pune Latest Crime News  
क्राईम

पुणे हादरले! जन्मदात्या आईनेच २ चिमुकल्यांचा बळी घेतला, झोपेतच गळा दाबला, पतीवरही कोयत्याने वार

Pune Crime News : किरकोळ वादातून जन्मदात्या आईनेच दोन चिमुकल्यांचा बळी घेतला. झोपेतच गळा दाबून मुलांची हत्या केली. आरोपी महिलेकडून पतीवर देखील कोयत्याने वार. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीमध्ये धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या.

Namdeo Kumbhar

मंगेश कचरे,

Pune Latest Crime News : पुण्यातील दौंडमधून अतिशय धक्कादायक आणि हादरवणारी बातमी समोर आली आहे. एका महिलेने चक्क आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केली. यासोबतच या महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केलेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्वर ही धक्कादायक घटना घडली. दौंड पोलिसांनी 30 वर्षीय आरोपी महिलेला अटक केली आहे.

शंभू दुर्योधन मिढे वय ०१ वर्ष आणि पियू दुर्योधन मिढे वय ०३ वर्ष अशी मयत मुलांची नावे आहेत. या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिढे वय 35 वर्ष याला देखील कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केलं आहे. पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

आज पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT