Pune News Saam Tv
क्राईम

Pune Crime: पुण्यात चाललयं तरी काय? चोरट्यांकडून अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, पोलिसांनी केला गोळीबार; नवले पुलाजवळ थरारक घटना!

Pune Latest News: गाडी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांच्या दिशेने पोलिसांनी गोळीबार केला. शहरातील नवले पुलाजवळ वंडरसिटी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता. २२ जुलै २०२४

पुणे शहरातील गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शहरात खून, मारामाऱ्या असे प्रकार वाढत असतानाच काही चोरट्यांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी पोलिसांकडूनही चोरट्यांवर गोळीबार करण्यात आला. शहरातील नवले पुलावर घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चोरट्यांनी पोलिसांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. यावेळी गाडी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांच्या दिशेने पोलिसांनी गोळीबार केला. शहरातील नवले पुलाजवळ वंडरसिटी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

उपनिरीक्षक रतिकांत कोळी यांच्यासह पोलिसांचे पथक रविवारी मध्यरात्री नवले पूल परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी वंडरसिटी भागात दोघेजण मोटारीतील डिझेल काढून घेत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांना पाहताच दोघे तरुण मोटारीतून पळून जात होते. पोलीस उपनिरीक्षक कोळी यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

परंतु चोरट्यांनी पोलिसांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपनिरीक्षक कोळी यांनी प्रसंगावधान राखत चोरट्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर चोरटे नवले पुलाच्या दिशेने पसार झाले. या घटनेत कोणी जखमी झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी उपनिरीक्षक रतिकांत कोळी यांनी फिर्याद दिली आहे असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT