Pune Crime News Saam Digital
क्राईम

Pune Crime News: चक्क 'गर्लफ्रेंड'ला इम्प्रेस करण्यासाठी मोबाईल चोरी, पोलिसांनी लावला डोक्याला हात

Pune Crime News: पुण्यातील एका तरुणाने चक्क 'गर्लफ्रेंड'ला इंप्रेस करण्यासाठी मोबाईलची चोरी केली आहे आणि ही चोरी काही एक दोनवेळा केलेली नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Crime News

मोबाईल चोरीचे अनेक किस्से तुम्ही ऐकला असाल. मात्र पुण्यात केलेल्या मोबाईल चोरीचं कारण ऐकून डोक्याला हात लावाल. पुण्यातील एका तरुणाने चक्क 'गर्लफ्रेंड'ला इंप्रेस करण्यासाठी मोबाईलची चोरी केली आहे आणि ही चोरी काही एक दोनवेळा केलेली नाही. दरम्यान पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल १५ मोबाईल जप्त केले आहेत.

अर्जुन महादेव शेलार (वय १८, रा. भिवरी, ता. पुरंदर) व प्रेम राजू शेलार (वय २०) अशी अटक केलेल्या मोबाईल चोरट्यांनी नावे आहेत. त्यांनी पुण्यातील वेगवेगळ्या भागातून हे मोबाईल चोरल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोघांनी अजून कुठेकुठे मोबाईल किंवा इतर चोऱ्या केल्या आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लुटमारीत मोबाईल पळवणे, रस्त्यावर मोबाईल हिसकावणे किंवा रहिवाशी भागातून मोबाईल चोरीच्या घटना सर्रास होत असतात. त्यामुळे पोलिसांकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणांचा छडा लावला जात आहे. दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्थानकाचे पोलीस गस्त घालत असताना त्यांना चोरीचे मोबाईल विक्रीसाठी दोघे चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी या दोघा मोबाईल चोरट्यांचा ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तब्ब्ल १५ मोबाईल आढळून आले.

त्यांची चौकशी करताना त्यातील एकाने आपल्याला गर्लफ्रेंड आहे आणि तिला इम्प्रेस करण्यासाठी आपण मोबाईल चोरल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनीही डोक्याला हात लावला. गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेल्यांनतर तो तिला वेगवेगळे मोबाईल दाखवत असे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT